जळगावात भाजपचे 27 नगरसेवक कसे फुटले, 15 संख्याबळ असताना शिवसेनेचा महापौर कसा? आतल्या घडामोडी काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी 'टीव्ही 9 मराठी'सोबत बातचित करताना सर्व घटनाक्रम सांगितला (How shiv sena candidate win Jalgaon Mayor election).

जळगावात भाजपचे 27 नगरसेवक कसे फुटले, 15 संख्याबळ असताना शिवसेनेचा महापौर कसा? आतल्या घडामोडी काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेचे एकनाथ खडसे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचा फाईल फोटो
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 4:49 PM

जळगाव : इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एमआयएम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली. जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र, असं असताना देखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. हे शक्य कसं झालं याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करताना सर्व घटनाक्रम सांगितला (How shiv sena candidate win Jalgaon Mayor election).

शिवसेनेचा महापौर कसा झाला? खडसे म्हणतात….

“गेल्या दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. यावेळी सर्वसामान्य चर्चा झाली. जळगावमध्ये काय सुरु आहे, परिस्थिती कशी आहे, याबाबत चर्चा झाली. जळगावची सध्याची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. रस्ते चांगले नाहीत. पाण्याची दुरावस्था आहे. लक्ष द्यायला कुणी तयार नाही. नगरसेवकांवर लोकांची नाराजी आहे. अशा परिस्थितीत जनता वेठीस धरते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करावा, असं मी मुख्यमंत्र्यांना सूचवलं. फक्त जळगावात लोकांची प्रश्न सूटली पाहिजेत, असं मी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं (How shiv sena candidate win Jalgaon Mayor election).

’25  बंडखोर माझ्या संपर्कात होते’

“मी मुख्यमंत्र्यांना, मंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं, 15 तुमचे आहेत. 25 माझ्याकडे येतील. 40 नगरसेवक होऊ शकतात. 3 एमआयएमचे आधीच आले होते. बंडखोर 22 लोकं होते. ते जवळपास महिन्याभरापासून माझ्या आणि माझ्या दोन कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. पंधरा दिवसांपूर्वी ते दोन वेळा मला भेटले. पण ते एकट्याने शक्य नव्हतं. म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यांच्या मदतीने हा विषय पुढे आला होता. हा विषय आता पूर्णत्वास आला आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे जास्त अपेक्षा आहेत. बाकीच्यांना हे विषय माहितही नव्हते. चार-पाच विषयांच्यापलिकडे हा विषय गेला नाही. नंतर गुलाबराव पाटलांना आम्ही हा विषय सांगितला. त्यानंतर त्यांनी सगळ्यांना गोळा करुन हे सर्व जुळवून आणले. विकासकामे व्हावे अशी आमची मागणी आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘फक्त चौघांमध्ये निर्णय झाला’

“शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, मी, खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्या चौघांचा शिवसेनेचा महापौर करायचा असा निर्णय झाला. बरेचसे नाराज नगरसेवक होते. माझ्याकडे जवळपास 20 ते 22 नाराज नगरसेवक होते. ते नाराज असल्याने त्यांनी स्वत:हून पाठिंबा देण्याचं मान्य केलं. ठेकेदार पद्धतीने भ्रष्टाचार चाललेला आहे. त्यावर नगरसेवक नाराज होते. त्यामुळे नाराज नगरसेवक एकत्र आले. सर्व शिवसेनेकडे गेल्यानंतर बाकिच्या लोकांच्या मदतीने आज शिवसेनेचा महापौर झाला. शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. तर बाकीचे बंडखोर आहेत”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं

शिवनसेनेने सर्व 30 बंडखोर नगरसेवकांना ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गेल्या दोन दिवसापासून ठेवलेण्यात होते. इथूनच ऑनलाईन पद्धतीने मतदान पार पडले. या मतदानानंतर जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत.

ठाण्याच्या हॉटेलमध्ये शिवसेनेचा जल्लोष

जळगाव प्रमाणेच ठाण्यातील हॉटेलमध्ये देखील या निवडणुकीनंतर शिवसेनेने मोठा जल्लोष साजरा केला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि नगरसेवक राम रेपाळे यांनी नगरसेवकांची जबाबदारी घेतली होती. त्यामुळेच सांगली महानगरपालिकेनंतर भाजपला जळगाव महानगरपालिकेत देखील पराभवाला सामोरे जावे लागले

गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

“जळगावमध्ये सेनेला मिळालेले यश आहे ही आनंदाची बात आहे. भाजपचे 27 नगरसेवकांची नाराजी आणि कुठलाही विकास या शहरात झाला नाही. त्यामुळे भाजप नगरसेवक आणि एमआयएमचे 3 नगरसेवक आमच्या पक्षात आले. आता खऱ्या अर्थाने जळगावमध्ये विकास होईल”, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा विजय सेनेच्या पारड्यात पडला, अशी चर्चा आहे.

हेही वाचा : शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.