AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad on Raj Thackeray | हाजी अराफत शेखच्या बाजूला बसून जेवायचात, त्याला दाढी होती का? राज ठाकरेंच्या ‘वस्तरा’ टीकेला आव्हाडांचं उत्तर

कोणे एके काळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असलेल्या आणि आता भाजपमध्ये असलेल्या हाजी अराफत शेख यांच्या बाजूला बसून तुम्ही जेवायचात, त्याला दाढी होती का, हे तुम्हाला आठवत नाही का? असा सवाल विचारत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं.

Jitendra Awhad on Raj Thackeray | हाजी अराफत शेखच्या बाजूला बसून जेवायचात, त्याला दाढी होती का? राज ठाकरेंच्या 'वस्तरा' टीकेला आव्हाडांचं उत्तर
राज ठाकरेंना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तरImage Credit source: टीव्ही9
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 13, 2022 | 12:36 PM
Share

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपमध्ये गेलेले नेते हाजी अराफत शेख यांचा दाखला देत गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या टीकेला उत्तर दिलं. “तुम्ही बोललात की मशिदीत वस्तरा कसा सापडेल, कारण ते (मुस्लीम बांधव) दाढीच करत नाहीत, तुम्ही विसरलात का, तुमचा एक मित्र होता, हाजी अराफत शेख, जो आता भाजपचा अल्पसंख्याक विकास प्रमुख आहे, तो मनसेच्या वाहतूक सेनेचा अध्यक्ष होता. त्याच्या बाजूला बसून तुम्ही कित्येक वेळा जेवायचात, विसरलात का, तो दाढीच करायचा नाही, साफ दाढीचा होता, असं आव्हाड म्हणाले. मशिदीत वस्तरा जरी सापडला तरी बघा, या आव्हाडांच्या जुन्या टीकेला मंगळवारी ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी उत्तर दिलं होतं. सुळे घुसले की किती त्रास होतो हे तुम्हाला माहित आहे ना, असं म्हणत आव्हाडांनी राज ठाकरेंनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

“मुंब्य्रात आता खूप बदल”

तुम्हाला फक्त स्मृतीत आणून देत आहे, बाकी काहीही करत नाही. मी 2009 मध्ये मुंब्य्राला गेलो, तेव्हापासूनचा इतिहास चाचपडून पाहा, फक्त दोन वेळा अतिरेकी सापडले, तेही बाहेरुन आलेले, कारण मुंब्य्रात आता इतका बदल झाला आहे, की लोक वेगळा विचार करणारच नाहीत, असं आव्हाड म्हणाले. राजसाहेब, बोलताना इतिहास, आपल्या बाजूला कोण बसलंय, हे पाहा, असंही आव्हाड म्हणाले.

“वर्णद्वेष, जातीवाद किती ठासून भरलाय”

तुम्ही एक उदाहरण दिलंत, तुमच्या समोर एक मुसलमान बसला होता, त्याला दाढी होती का, तुम्ही मुसलमानांना सर्टिफिकेट देणार का, की हा देशद्रोही आहे, हा नाही, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर जाता, नाकावर जाता, रंगावर जाता, तुमच्यात वर्णद्वेष, जातीवाद किती ठासून भरलाय हे दिसतं. रंग-वर्ण हे कधीही काढू नये. आम्ही जर म्हटलं तुम्ही कसे ढोरपोटे झालाय, तुमचं तोंड कसं सुजलंय, तर तुम्हाला आवडेल का, अशी बोचरी टीकाही आव्हाडांनी केली.

संबंधित बातम्या :

अजित पवार, तुमच्या माहितीसाठी म्हणून तीन व्हिडीओ आणलेत, राज ठाकरेंचं पुन्हा लाव रे तो व्हिडीओ

तर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, राज ठाकरे भोंगे लावण्यावर ठाम, आता कारणेही सांगितली

उभा टाक, राज ठाकरेंनी भर सभेत नगरसेवक सलीम मामू शेखला जेव्हा उभं केलं

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ