AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिट अँड रन प्रकरण भोवलं, API सुहास खरमाटे निलंबित,पालघर पोलीस अधीक्षकांची कारवाई

हिट अँड रन प्रकरणातील आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे याला अखेर निलंबित करण्यात आलंय. दोन दिवसांपूर्वी तारापूर चिंचणी मार्गावर भरधाव वेगात सुहास खरमाटे यांच्या चारचाकी गाडीनं धडक दिली होती.

हिट अँड रन प्रकरण भोवलं, API सुहास खरमाटे निलंबित,पालघर पोलीस अधीक्षकांची कारवाई
पोलिसाच्या कारचा थरार
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 07, 2021 | 4:09 PM
Share

पालघर: हिट अँड रन प्रकरणातील आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे याला अखेर निलंबित करण्यात आलंय. दोन दिवसांपूर्वी तारापूर चिंचणी मार्गावर भरधाव वेगात सुहास खरमाटे यांच्या चारचाकी गाडीनं धडक दिली होती. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्या व्यक्तीवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी अखेर सुहास खरमाटे यांच्यावर कारवाई केली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय?

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये हिट अँड रनचं प्रकरण उघडीकस आलं होतं. विशेष बाब म्हणजे सहायक पोलीस निरीक्षकाच्या गाडीनं एका दुचाकीस्वाराला उडवलं होती. ती गाडी सुहास खरमाटे यांची होती. याशिवाय तीन चाकावर गाडी चालवल्याचा थरार देखील घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितंल होतं. या घटनेप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आलाय. आता सुहास खरमाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. डहाणू पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकावर वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तारापूर ते डहाणू पोलीस ठाण्यापर्यंत भरधाव गाडी चालवून अपघात करून काहींना जखमी केल्याची घटना घडलीय. जखमींपैकी एकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्या व्यक्तीला नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

18 किलोमीटरपर्यंत तीन चांकांवर भरधाव वेगात चालवली कार

पोलीस निरीक्षकाच्या गाडीनं एका बाईकस्वाराला जोरदार धडक दिली. यानंतर चक्क तीन चाकांवर कार जवळपास 18 किलोमीटर पर्यंत भरधाव चालवण्यात आली. डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात पार्क करून कार चालक भिंतीवरून उडी मारून पळून गेल्याचे सांगितले जातंय.

कार नेमकी कोणं चालवत होतं?

डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात पार्क करण्यात आलेल्या कार मध्ये पोलीस हॅट कॅप सुद्धा आढळून आली आहे. ही अपघाताची घटना वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तर, सुहास खरमाटे हे अजूनही फरार असल्याचे बोलले जातेय. मात्र, गाडी नेमकी कोण चालवत होतं हे अद्याप समोर आलेलं नाही. विशेष म्हणजे या गाडीमध्ये पोलिसांची टोपी असल्याने एकच खळबळ उडाली होती.

इतर बातम्या:

Video: पालघरच्या डहाणूमध्ये हिट अँड रन, पोलिसाच्या गाडीनं दुचाकीस्वाराला उडवलं, तीन चाकांवर गाडी चालवण्याचा थरार, गुन्हा दाखल

‘राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये’! बाळासाहेब थोरातांची कोटी, उपस्थितांमध्ये खमंग चर्चा

Palghar SP suspend Assistant Police Inspector Suhas Kharmate for hit and run case

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...