‘राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये’! बाळासाहेब थोरातांची कोटी, उपस्थितांमध्ये खमंग चर्चा

या कार्यक्रमात बोलताना थोरातांनी नगर जिल्ह्याच्या उभारणीत योगदान असलेल्या नेत्यांचे आभार मानले. मात्र, विठ्ठलराव विखे-पाटील, बाळासाहेब विखे-पाटील यांचं नाव घेणं त्यांनी टाळलं.

'राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये'! बाळासाहेब थोरातांची कोटी, उपस्थितांमध्ये खमंग चर्चा
बाळासाहेब थोरात, शरद पवार


अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसनं आता शरद पवार यांच्यावलर जास्त हक्क सांगू नये. किती दिवस तुम्ही शरद पवार साहेबांचा आधार घेणार? अशी कोटी महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलीय. श्रीगोंदा येथील माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. (Balasaheb Thorat’s mischievous remarks on NCP from Sharad Pawar)

या कार्यक्रमात बोलताना थोरातांनी नगर जिल्ह्याच्या उभारणीत योगदान असलेल्या नेत्यांचे आभार मानले. मात्र, विठ्ठलराव विखे-पाटील, बाळासाहेब विखे-पाटील यांचं नाव घेणं त्यांनी टाळलं. अहमदनगर जिल्हा खूप मोठा आहे. तीनशे किलोमीटर लांबी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याला अनेक नेत्यांनी एक ठेवलं. कोण मोडत असेल तर त्याल उभं करणारी माणसं नगर जिल्ह्यात होती, असं थोरात म्हणाले. श्रीगोंदा तालुका हा संपन्न तालुका आहे. या तालुक्याइतके पुढारी आणि कार्यकर्ते कुठेही नसतील. कुकडीचे पाणी हा आमचा महत्वाचा प्रश्न आहे. जयंत पाटील साहेब तुमचे आभार, तुम्ही हा प्रश्न मान्य केला. जयंत पाटील यांनी बंदीची आपल्यासाठी जास्त सोडली आहे, असंही थोरात म्हणाले.

‘पवारसाहेब कृषीमंत्री असताना मी राज्यात कृषीमंत्रीपद मागून घेतलं’

पवारसाहेब कृषीमंत्री होते तेव्हा मी राज्यात कृषीमंत्रीपद मागून घेतलं होतं. कारण, वर पवार साहेब असल्यामुळे खाली काही कमी पडणार नाही, हे मला माहिती होतं. मला शेजारी बसवून ते संपूर्ण राज्यातील कृषी मंत्र्यांशी चर्चा करायचे. कारण मला शेतीतील समजावं हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं आता साहेबांवर जास्त हक्क सांगू नये. किती दिवस शरद पवारांचा तुम्ही आधार घेणार, अशी मिश्किल टिप्पणीही थोरातांनी यावेळी केली.

पवारांनी सांगितला ‘पाणीदार’ किस्सा

‘दुष्काळ पाहण्यासाठी इंदिरा गांधी आणि पंडित नेहरु आले होते. पण आता पाणी आलं आहे, परिस्थितीत बदलली आहे. नगर जिल्ह्यात खूप जागृती असते. पाण्याच्या प्रश्नावरुन या जिल्ह्यात खूप वाद व्हायचे. इथे लग्नानंतर भाषणे करायची पद्धत होती आणि त्या भाषणात लग्न लागल्यानंतर पाण्यावरुन भाषणं व्हायची’, असा एक किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

..तर शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील- पवार

साखर उद्योग सध्या अडचणीतून जात आहे. आता आपण वीज आणि इथेनॉल साखर कारखान्यात तयार करतो. इथेनॉलपेक्षा एक नवीन पदार्थी हायड्रोयजन आला आहे. त्यावर आमचा अभ्यास सुरु आहे. ते जर सुरु झालं तर शेतकऱ्यांना टनामागे जास्त पैसे मिळतील. वीज आणि इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना दीडशे ते दोनशे रुपये जास्त मिळणार आहेत, असं पवारांनी सांगितलं.

इतर बातम्या :

‘शबाब, शराब, कबाब आणि नवाब’वरून नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यात जुंपली, वाचा दावे-प्रतिदावे

VIDEO | धनंजय मुंडेंतर्फे आयोजित कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके, मेटे म्हणतात, सामाजिक मंत्र्यांचं भान…

Balasaheb Thorat’s mischievous remarks on NCP from Sharad Pawar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI