‘शबाब, शराब, कबाब आणि नवाब’वरून नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यात जुंपली, वाचा दावे-प्रतिदावे

हॉटेल द ललितमधील शबाब, शराब आणि कबाबच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यात चांगलीच जुंपली आहे. (Mohit Kamboj reply to Nawab Malik on allegations of conspiracy to drugs party)

'शबाब, शराब, कबाब आणि नवाब'वरून नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यात जुंपली, वाचा दावे-प्रतिदावे
Mohit Kamboj


मुंबई: हॉटेल द ललितमधील शबाब, शराब आणि कबाबच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ललितमध्ये शबाब, शराब आणि कबाब होते. पण त्यात नवाब नव्हता, असं नवाब मलिक म्हणाले. तर ललितमध्ये शबाब, शराब, कबाबही होते आणि नवाबही होते, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे ललित हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? याबाबतचं गूढ वाढलं आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आर्यन खान प्रकरणावर नवे गौप्यस्फोट केले. यावेळी द ललित हॉटेलचाही त्यांनी उल्लेख केला. ललित हॉटेल सात महिने बुक होती. तिथूनच प्रायव्हेट आर्मी तिथून काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा अनेक लोक येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरू होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. वानखेडेच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असं मलिक म्हणाले.

कंबोज यांनी केला 1100 कोटीचा फ्रॉड

मोहित कंबोज यांनी बँकेत मोठा फ्रॉड केला होता. त्यांनी 1100 कोटी रुपयांचा फ्रॉड केला. त्याच्यावर दीड वर्षापूर्वी धाड पडली होती. पण भाजपमध्ये गेल्यावर सर्व काही बंद झालं. या प्रकरणी कारवाई न झाल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असंही मलिक यांनी सांगितलं.

 

कंबोज यांचा दावा काय?

मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला. ललित हॉटेलमध्ये शबाब, शराब, कबाब होतेच पण नवाबही होते. तुमचं सरकार आहे ना मग लगेच ललित हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करा. त्यात सर्व काही उघड होईल, असं सांगतानाच तसेच गेल्या पाच वर्षात हॉटेल ललितला गेलो नाही. सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा. मी पुरावे घेऊन बोलतो. हवेत बोलत नाही, असं कंबोज म्हणाले.

कोणत्या भंगारातून कोट्यवधी कमावले?

मलिक यांची मुलं 47 लाखाची इन्कम दाखवून मोठमोठी प्रॉपर्टी घेत आहेत. कोणते भंगार विकून मलिक यांनी कोट्यवधी रुपये कमावले? असा सवाल करतानाच या प्रकरणावरून लक्ष विचलीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माझा आवाज दाबला जात आहे. माझा आवाज दाबू शकतील, मला बसवू शकतील असं त्यांना वाटतं. मला घाबरवू असं त्यांना वाटतं. पण मी त्यांना घाबरत नाही. तुम्ही कोणतीही चौकशी करा, कोणतीही केस करा. मी घाबरणार नाही, असंही कंबोज यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: सुनील पाटीलचे अमित शहांबरोबर व्हिडीओ; नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

अस्लम शेख यांचे काशिफ खानशी संबंध काय? मलिक यांचे आरोप गंभीर, कॉल रेकॉर्ड चेक करा; मोहित कंबोज यांची मागणी

क्रुझ पार्टीसाठी महाविकासआघाडी सरकारमधील ‘या’ मंत्र्यालाही निमंत्रण, नवाब मलिकांना उघड केला काशिफ खानचा कट

(Mohit Kamboj reply to Nawab Malik on allegations of conspiracy to drugs party)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI