VIDEO: सुनील पाटीलचे अमित शहांबरोबर व्हिडीओ; नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

सुनील पाटील यांना मी आयुष्यात कधीच भेटलो नाही. त्यांचे आणि माझे काहीच संबंध नाही, असं सांगतानाच सुनील पाटील यांचे भाजप नेते अमित शहांबरोबरचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. (i have never met sunil patil in my life, says Nawab Malik)

VIDEO: सुनील पाटीलचे अमित शहांबरोबर व्हिडीओ; नवाब मलिकांचा खळबळजनक दावा
Nawab Malik
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 3:13 PM

मुंबई: सुनील पाटील यांना मी आयुष्यात कधीच भेटलो नाही. त्यांचे आणि माझे काहीच संबंध नाही, असं सांगतानाच सुनील पाटील यांचे भाजप नेते अमित शहांबरोबरचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते मोहित कंबोज यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच सुनील पाटील प्रकरणावरही भाष्य केलं. सुनील पाटीलला मी आयुष्यात भेटलो नाही. सुनील पाटीलचा राष्ट्रवादीशी काहीच संबंध नाही. उलट पाटीलचे अमित शहासोबतचे व्हिडीओ आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत. सुनील पाटीलचे मंत्री राणांसोबतचे कंबोज फोटो दाखवत होते, असा दावा मलिक यांनी केला आहे.

पाटील वानखेडेंच्या प्लेअर

आम्ही फोटोंवरून आरोप करत नाही. कोणत्या पक्षाचा व्यक्ती आहे हे आम्ही सांगत नाही. पण सुनील पाटीलही फ्रॉड आहेत. तेही वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा प्लेअर आहे, असा दावा त्यांनी केला.

सुनील पाटीलचा फोन आला होता

6 तारखेला मी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा मला पत्रकार परिषदेच्या दोन तासानंतर सुनील पाटीलचा फोन आला होता. साहेब मी धुळ्याहून बोलतोय. मी तुम्हाला या पत्रकार परिषदेबाबत अधिक माहिती देऊ शकतो, असं सुनील पाटील म्हणाले होते. त्यावर मी त्यांना मुंबईत यायला सांगितलं. दुसऱ्या पत्रकार परिषदेवेळीही त्यांचा फोन आला. विजय पगारे जेव्हा माझ्याकडे आले. तेव्हाही पाटील आले नाही. पगारेंसोबत भंगाळे नावाचा व्यक्ती होता. त्याच्या फोनवरून त्यांनी सुनील पाटीलशी चर्चा केली. तुम्ही घाबरू नका. मलिक साहेब तुम्हाला पोलिसांच्या हवाली करतील असं भंगाळेंनी पाटील यांना सांगितलं. मला नंबर दिला. तेव्हा मी डायल केला असता पाटीलचाच नंबर होता. मी सांगितलं तुम्ही या पोलिसांना शरण या. सत्य सांगा. त्यावर ते म्हणाले की, मी गुजरातला आहे. मला थांबवलं आहे. मी कोणत्याही परिस्थितीत येईल. पण अजून ते आले नाहीत, असं मलिक यांनी सांगितलं.

माझी लढाई चुकीच्या लोकांविरोधात

यावेळी मलिक यांनी आपली लढाई कोणत्याही पक्षाविरोधात किंवा राजकारण्याविरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. वानखेडेची आर्मी ड्रग्ज वसुली करणाऱ्यांकडूनही पैसे उकळत आहे. वानखेडेंनी या शहराला पाताल लोक केलं आहे. मी एनसीबीविरोधात लढत नाही. मी भाजपविरोधातील लढाई नाही. मी चुकीच्या लोकांविरोधात लढत आहे. या शहरात ड्रग्जच्या नावावर हजारो कोटींची वसुली होत आहे. निरपराध मुलांना फसवलं जात आहे. नशेचा कारोबार चालत आहे. लोकांना टार्गेट करून वसुली सुरू आहे. त्याविरोधात माझा लढा आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा

क्रुझ पार्टीसाठी महाविकासआघाडी सरकारमधील ‘या’ मंत्र्यालाही निमंत्रण, नवाब मलिकांना उघड केला काशिफ खानचा कट

(i have never met sunil patil in my life, says Nawab Malik)

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.