AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा

सध्या जो खेळ सुरू आहे, तो काही मेरा नाम जोकर किंवा संगम या दोन चित्रपटांचे इंटरव्हल नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. (picture will not end till villain arrest, says nawab malik)

व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा
Nawab Malik
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 11:15 AM
Share

मुंबई: सध्या जो खेळ सुरू आहे, तो काही मेरा नाम जोकर किंवा संगम या दोन चित्रपटांचे इंटरव्हल नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाचा आणखी भांडाफोड केला. हे काही मेरा नाम जोकर आणि संगम या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीयेत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. ललित हॉटेल सात महिने बुक होती. तिथूनच प्रायव्हेट आर्मी तिथून काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा अनेक लोक येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरू होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. वानखेडेच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असं मलिक म्हणाले.

वानखेडे नंतर रडणार

मोहित कंबोज हा आर्यन खान किडनॅपिंगचा मास्टर माइंड आहे. त्यात सॅम डिसूझाचाही सहभाग आहे. आज ना उद्या ते आतमध्येा जाणारच असंही त्यांनी सांगितलं. माझे आरोप खोटे असल्याचं सांगत समीर वानखेडे आता हसत आहेत. पण नंतर ते रडणार आहेत. सत्यमेव जयते होणारच आहे, असा दावाही त्यांनी केला.

चांडाळ चौकडीचा खेळ

एनसीबीच्या कार्यालयात एक चांडाळ चौकडी आहे. हीच चांडाळ चौकडी सर्व खेळ करत आहे. समीर वानखडे, व्हीव्ही सिंग, आशिष रंजन आणि माने नावाचा ड्रायव्हर यांची चांडाळ चौकडी या प्रकरणात कार्यरत होती. असं सांगतानाच गेल्यावेळी माझ्याकडून एक चुकीची माहिती दिली गेली. व्ही. व्ही. सिंग यांनी माझ्या जावयाकडून रेंज रोव्हर मागितली नव्हती. तर आशिष रंजनने रेंज रोव्हर मागितली होती, असं मलिक म्हणाले.

शाहरुखला घाबरवण्याचा प्रयत्न

आर्यन खानला अटक केल्यानंतर मी एनसीबीची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एनसीबीकडून शाहरुख खानला घाबरवण्याचं काम केलं गेलं. नवाब मलिकने बोलायचं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घकाळासाठी आत जाईल, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं होतं, असा दावा मलिक यांनी केला. पडद्यामागे काय होत आहे हे मला माहीत नाही. वानखेडे कुणाला फोन करत आहे हे मी नंतर मी उघड करेन. महिलांनाही धमकावलं जात आहे, त्याचीही माहिती मी उघड करेन, असं त्यांनी सांगितलं.

मोहित कंबोज यांनी बँकेत मोठा फ्रॉड केला होता. त्यांनी 1100 कोटी रुपयांचा फ्रॉड केला. त्याच्यावर दीड वर्षापूर्वी धाड पडली होती. पण भाजपमध्ये गेल्यावर सर्व काही बंद झालं. या प्रकरणी कारवाई न झाल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं, पण एका जागेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीत चढाओढ

मुंबईत मोहित कंबोजच्या मालकीची 12 हॉटेल्स, आसपासची हॉटेल्स बंद पाडण्यासाठी घ्यायचे समीर वानखेडेंची मदत: नवाब मलिक

(picture will not end till villain arrest, says nawab malik)

Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष