मुंबईत मोहित कंबोजच्या मालकीची 12 हॉटेल्स, आसपासची हॉटेल्स बंद पाडण्यासाठी घ्यायचे समीर वानखेडेंची मदत: नवाब मलिक

Nawab Malik | मुंबईत मोहित कंबोज याच्या मालकीची 12 हॉटेल्स आहेत. मुंबईत कुणाल जानीच्या मालकीचे बास्कीन हे हॉटेल आहे. उच्चभ्रू वर्गात हे हॉटेल लोकप्रिय आहे. मात्र, मोहित कंबोजने याच परिसरात ओपा हॉटेल सुरु केले. बास्किन हॉटेल बंद पाडण्यासाठी मोहित कंबोजने समीर वानखेडे यांच्या माध्यमातून कुणाल जानीला खोट्या प्रकरणात अडकवले.

मुंबईत मोहित कंबोजच्या मालकीची 12 हॉटेल्स, आसपासची हॉटेल्स बंद पाडण्यासाठी घ्यायचे समीर वानखेडेंची मदत: नवाब मलिक
नवाब मलिक


मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज हे एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. ड्रग्ज सेवन करणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रिटींकडून खंडणी उकळण्याच्या रॅकेटमध्ये समीर वानखेडे आणि मोहित कंबोज हे साथीदार होते. मुंबईत मोहित कंबोज यांच्या मालकीची 12 हॉटेल्स आहेत. मोहित कंबोज स्वत:च्या हॉटेल्सच्या आसपास असणारी इतर हॉटेल्स बंद पाडण्यासाठी त्यांच्या मालकांना समीर वानखेडे यांच्या माध्यमातून खोट्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अडकवत असे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.

नवाब मलिक रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांच्यातील हितसंबंधांचा पर्दाफाश केला. मुंबईत मोहित कंबोज याच्या मालकीची 12 हॉटेल्स आहेत. मुंबईत कुणाल जानीच्या मालकीचे बास्कीन हे हॉटेल आहे. उच्चभ्रू वर्गात हे हॉटेल लोकप्रिय आहे. मात्र, मोहित कंबोजने याच परिसरात ओपा हॉटेल सुरु केले. बास्किन हॉटेल बंद पाडण्यासाठी मोहित कंबोजने समीर वानखेडे यांच्या माध्यमातून कुणाल जानीला खोट्या प्रकरणात अडकवले. जेणेकरून कुणाल जानी बास्किन हॉटेल बंद करतील, असा मोहित कंबोज यांचा प्रयत्न असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

‘माझ्या पत्रकारपरिषदेनंतर समीर वानखेडे घाबरले, 7 ऑक्टोबरला मोहित कंबोजला भेटले’

आर्यन खानला अटक झाल्यानंतर मी पत्रकारपरिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर 7 ऑक्टोबरला मुंबईतील ओशिवरा दफनभूमीच्या बाहेर समीर वानखेडे यांनी मोहित कंबोज यांची भेट घेतली होती. मात्र, या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे याचा व्हीडिओ माझ्याकडे नाही. परंतु, या परिसरातील लोकांनी ओशिवरा दफनभूमीच्या बाहेर अशी भेट झाल्याचे सांगितले आहे. समीर वानखेडे यांना या गोष्टीची कुणकुण लागल्यानंतर समीर वानखेडे यांनी घाबरुन मुंबई पोलिसांकडे कोणीतरी माझा पाठलाग करत असल्याची तक्रार केली होती, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड; मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोप

किरण गोसावी हाच राष्ट्रवादीच्या सुनील पाटीलचा पंटर, मोहित कंबोज यांचा मोठा गौप्यस्फोट; ड्रग्जप्रकरणात ट्विस्ट?

मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI