राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड; मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोप

Mohit Kamboj | आर्यन खान प्रकरणात याच सुनील पाटीलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 1 ऑक्टोबरला सॅम डिसोझाला फोन केला होता. मुंबईत क्रुझ पार्टी होणार असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या 27 लोकांची माहिती माझ्याकडे असल्याचे सुनील पाटीलने सॅम डिसोझाला सांगितले.

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड; मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोप
मोहित कंबोज
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 11:43 AM

मुंबई: आर्यन खानसह क्रुझवरील अन्य लोकांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) जाळ्यात अडकवण्यात सुनील पाटील या व्यक्तीने मास्टरमाईंडची भूमिका पार पाडली आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांशीही सुनील पाटीलचे जवळचे संबंध आहेत, असा दावा भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी केला. ते शनिवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

आर्यन खान प्रकरणात याच सुनील पाटीलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 1 ऑक्टोबरला सॅम डिसोझाला फोन केला होता. मुंबईत क्रुझ पार्टी होणार असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या 27 लोकांची माहिती माझ्याकडे असल्याचे सुनील पाटीलने सॅम डिसोझाला सांगितले. तसेच मला एनसीबीच्या अधिकाऱ्याशी बोलायचे आहे, असेही सुनील पाटीलने सांगितले. देशाच्या भल्याचे काम करण्याच्या हेतूने सॅम डिसोझाने सुनील पाटीलचा एनसीबीचे अधिकारी व्ही.व्ही. सिंग यांच्याशी संपर्क साधून देण्याचे मान्य केले.

त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे कोणती माहिती आहे, अशी विचारणा केली. तेव्हा सुनील पाटील याने त्याचा सहकारी के.पी. गोसावी याच्याकडे क्रुझ पार्टीशी संबंधित माहिती असल्याचे सांगितले. पाटीलने सॅमला गोसावीचा नंबरही पाठवला आणि किरण गोसावीच सर्व कारवाई करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे हा सगळा कट सुनील पाटील यानेच रचला होता. सुनील पाटील हा महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्याच्या इशाऱ्यावर हे सगळे काम करत होता, असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.

सुनील पाटील कोण आहे?

सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा कार्यकर्ता आहे. अनिल देशमुखांच्या मुलाशी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत, असा दावा मोहित कंबोज यांनी केला. सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होता. तोच पैसा घ्यायचा आणि संबंधित मंत्र्यांना द्यायचा. त्यांचं राज्यभरात रॅकेट होतं. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालत असल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

किरण गोसावी हाच राष्ट्रवादीच्या सुनील पाटीलचा पंटर, मोहित कंबोज यांचा मोठा गौप्यस्फोट; ड्रग्जप्रकरणात ट्विस्ट?

नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती, भंगारवाला करोडपती कसा झाला?; मोहित भारतीय यांचा सवाल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.