किरण गोसावी हाच राष्ट्रवादीच्या सुनील पाटीलचा पंटर, मोहित कंबोज यांचा मोठा गौप्यस्फोट; ड्रग्जप्रकरणात ट्विस्ट?

भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. किरण गोसावी हाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील पाटील यांचा पंटर आहे. (nexus between sunil patil and kiran gosavi, says mohit kamboj)

किरण गोसावी हाच राष्ट्रवादीच्या सुनील पाटीलचा पंटर, मोहित कंबोज यांचा मोठा गौप्यस्फोट; ड्रग्जप्रकरणात ट्विस्ट?
Mohit Kamboj

मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. किरण गोसावी हाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील पाटील यांचा पंटर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंडच सुनील पाटील आहे, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाची वेगळी बाजू मांडून एकच खळबळ उडवून दिली. माझ्या माणसाची एनसीबीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या असं पाटीलने सॅम डिसूजाला सांगितलं होतं. पाटील यांचा हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून किरण गोसावी होता. पाटीलने सॅमला गोसावीचा नंबरही पाठवला आणि किरण गोसावीच सर्व कारवाई करणार असल्याचं सांगितलं, असा गौप्यस्फोट कंबोज यांनी केला.

सुनील पाटीलच मास्टरमाइंड

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील आहेत. सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत, असा दावा कंबोज यांनी केला. अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पाटील यांचं बदल्यांचं रॅकेट

सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होते. दिल्लीत बसून ते हे रॅकेट चालवत असतात. तेच पैसा घेऊन संबंधित मंत्र्यांना द्यायचे. त्यांचं राज्यभरात बदल्यांचं रॅकेट होतं. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालतात. पाटील यांचे गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे? असा सवाल त्यांनी केला.

पाटीलला क्रुझ पार्टीची माहिती होती

सुनील पाटीलने 1 तारखेला सॅम डिसोजाला व्हॉट्सअॅप केलं होतं. चॅट नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला होता. माझ्याकडे 27 लोकांची लीड असून मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे. त्यात ड्रग्जचं सेवन होणार आहे. माझी एनसीबीच्या एखाद्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या, असं पाटीलने सॅमला सांगितलं होतं. त्यानंतर सॅमने एनसीबीच्या व्ही.व्ही. सिंग या अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं, असा दावाही त्यांनी केला.

 

संबंधित बातम्या:

नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती, भंगारवाला करोडपती कसा झाला?; मोहित भारतीय यांचा सवाल

Video: पालघरच्या डहाणूमध्ये हिट अँड रन, पोलिसाच्या गाडीनं दुाचाकीस्वाराला उडवलं, तीन चाकांवर गाडी चालवण्याचा थरार, गुन्हा दाखल

मोदींनी कणखरपणा दाखवला नसता तर आपण 60 देशांना लस पुरवली नसती : चंद्रकांत पाटील

(nexus between sunil patil and kiran gosavi, says mohit kamboj)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI