राफेल घोटाळ्याची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवत आहे? : बाळासाहेब थोरात

राफेल घोटाळ्यातील सत्य जनतेसमोर येण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

राफेल घोटाळ्याची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवत आहे? : बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 03, 2021 | 9:05 PM

मुंबई :राफेल फायटर जेटच्या व्यवहारात गौडबंगाल आहे. या व्यवहारात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने उघड केले. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही केली, परंतु मोदी सरकारने या व्यवहाराची चौकशी न करता प्रकरण गुंडाळले. सत्य जास्त दिवस लपत नसते. आज फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी सुरु झाली आहे. मग आता भारतातच राफेल व्यवहाराची चौकशी का केली जात नाही?” असा सवाल महसूलमंत्री व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विचारलाय. तसेच राफेल घोटाळ्यातील सत्य जनतेसमोर येण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली (Balasaheb Thorat criticize Modi government over Rafale deal corruption allegations).

बाळासाहेब थोरात म्हणाले, “युपीए सरकारच्या काळातच 126 राफेल फायटर जेट विमाने प्रत्येकी 556 कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित झाले होते. परंतु त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी भरमसाठ असे 1670 कोटी रुपये देऊन व्यवहार केला. हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आला. तसेच मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा यासाठी या क्षेत्रातील काहीही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले. या संपूर्ण व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते परंतु त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे मोदी सरकारने दुर्लक्ष करुन हे प्रकरण गुंडाळले.”

“‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य”

“राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये याची चौकशी सुरु झाली आहे. मग भारतातच या व्यवहारावर पांघरुण घालण्याचे काम का केले जात आहे. मोदी सरकार चौकशी करायला का घाबरत आहे आणि कोणाला वाचवण्यासाठी चौकशीपासून पळ काढला जात आहे. राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणले पाहिजे. अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसे ‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य आहे,” असंही थोरात म्हणाले.

हेही वाचा :

फ्रान्स सरकारनेही राफेलची चौकशी सुरू केलीय, आता मोदी सरकार करणार का? काँग्रेसचा सवाल

राफेल घोटाळ्याच्या चौकशीला मोदी सरकार का घाबरते? नाना पटोले यांचा सवाल

16 नको, 15 मिनिटंच द्या, मोदी उघडे पडतील: राहुल गांधी

व्हिडीओ पाहा :

Balasaheb Thorat criticize Modi government over Rafale deal corruption allegations

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें