Sanjay Raut : ‘…म्हणजे हा मराठी वरचा बलात्कार’, ठाणे महापालिकेच्या अजब निर्णयावर राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut : "बस डेपोची अवस्था काय आहे ते जाऊन पहा. तुम्ही महागड्या मर्सिडीज मधून फिरता तुम्हाला कोण देतो ते माहीत नाही. एकही मंत्री सरकारी गाडीतून फिरतो का? सगळ्यांच्या गाड्या ऑडी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आहेत. कोणी दिल्या तुम्हाला या गाड्या? कोणाच्या पैशातून आल्या? आणि सामान्य जनता ज्या एसटीतून फिरते, जिथे शिवशाही आहे त्यात बलात्कार हत्या आणि खून होत आहेत" अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut : ...म्हणजे हा मराठी वरचा बलात्कार, ठाणे महापालिकेच्या अजब निर्णयावर राऊतांची घणाघाती टीका
Sanjay Raut
| Updated on: Feb 27, 2025 | 11:50 AM

ठाणे महानगर पालिकेने एक अजब निर्णय घेतला आहे. ज्याने मराठीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे, त्यांची वेतन वाढ रोखून धरली आहे. ठाणे महानगर पालिकेत्या या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केलीय. “एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, मंत्रालयाचा कारभार मराठीतून झाला पाहिजे. या राज्यामध्ये मराठी भाषा विभागाच स्वतःच मंत्रालय आहे” असं संजय राऊत म्हणाले. आज मराठी राजभाषा दिन. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.

“देशाच्या राजधानीत मराठी साहित्य संमेलन भरवलं जातं. त्या संमेलनात मुख्यमंत्री, मोदीजी येतात आणि मराठीचा जयजयकार करतात. जे ठाणे शहर मराठीची पंढरी होती आणि साहित्यिक मोठे झाले, त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठाण्यात मराठी पदवीधरांना वेतन वाढ नाकारली जात असेल तर या राज्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाहक आम्हीच आहोत असे दाढीवाले जे सांगत आहेत त्या दाढीवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे. हा मराठी वरचा बलात्कार आहे” अशी बोचऱ्या शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

‘हीच का तुमची विचारवाहकता?’

“हीच का तुमची विचारवाहकता? शिवसेना या विषयावरती गप्प बसणार नाही ती आंदोलन करणार. फक्त मराठी भाषा दिवस साजरा करून चालणार नाही, मराठी भाषा गौरव दिवस मराठी भाषेचा गौरव राहणार नाही तर भाषा राहणार का ?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.