AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane : ठाण्यात डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, दीड महिन्यात चार बालकांचा मृत्यू

दीड महिन्यापुर्वी 5 डिसेंबर रोजी याच डबक्यात बुडून 11 वर्षाच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. अभिषेक शर्मा आणि कृष्णा गौड अशी दोघांची नावे आहेत. दोन्ही मुलं रामबाग उपवन येथील रहिवासी आहेत. हे दोघे पण या डबक्यात पोहण्यासाठी गेले होते.

Thane : ठाण्यात डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, दीड महिन्यात चार बालकांचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 8:13 PM
Share

ठाणे : ठाण्यातील उपवन रामबाग येथील मिलीट्री (फायर रेंज) मैदानानजीकच्या डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. गौतम वाल्मिकी (12) रा. शास्त्रीनगर आणि निर्भय चौहान (14) अशी मृतांची नावे आहेत. यातील निर्भय हा दोनच दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश येथून गौतमच्या घरी राहण्यास आला होता. रामबाग येथील हे पाण्याचे डबके 35 फूट खोल असून तळाला चिखल भरला आहे. या डबक्यात पोहण्याची हौस या दोन्ही मुलांच्या जीवावर बेतली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस, ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन व टीडीआरएफ पथक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही बालकांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. (Two children drowned while swimming in Thane, Four childrens die in a month and a half)

दीड महिन्यात चार मुलं बुडाली

या आदी देखील या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दीड महिन्यापुर्वी 5 डिसेंबर रोजी याच डबक्यात बुडून 11 वर्षाच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. अभिषेक शर्मा आणि कृष्णा गौड अशी दोघांची नावे आहेत. दोन्ही मुलं रामबाग उपवन येथील रहिवासी आहेत. हे दोघे पण या डबक्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी बुडून त्यांचा मृत्यू झाला. वारंवार या खड्ड्यात बुडून बाल मृत्यूच्या घटना घडत आहेत. मात्र तरीही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू

लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन दिवसापूर्वी दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर आठ मजली इमारत ही बेकायदा असल्याचे समोर आले आहे. डोंबिवली पूर्व भागातील सागाव परिसरात एका दुकानात काम करणाऱ्या राजकुमार मोर्या यांचा एकुलता एक मुलगा सत्यम मंगळवारी सायंकाळी खेळण्यास गेला, तो परतला नाही. तीन तासाच्या शोधानंतर त्याचा मृतदेह परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सापडला. आठ मजली इमारतीच्या लिफ्टकरकीता तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. त्याच पाण्यात बुडून सत्यमचा मृत्यू झाला होता. (Two children drowned while swimming in Thane, Four childrens die in a month and a half)

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याण आठवडा बाजारात फेरीवाल्यांकडून हफ्ता वसुली, माजी नगरसेवकावर आरोप

Fire Audit : मुंबईतील किती इमारतींचं फायर ऑडिट झालंय? माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.