AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Murbad Crime : मुरबाडमध्ये तरुणांची ‘मजा’ बनली ‘सजा’, गंमतीशीर व्हिडीओ बनवल्यानं तरुणांना मारहाण

तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ शूट करून तो या तीन गुंड रिक्षाचालकांनी व्हायरल केला. दुसरीकडे ज्या तरुणांना मारहाण करण्यात आली होती, ते तरुण मात्र घाबरून घरीच बसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी या तरुणांना शोधून काढलं आणि त्यांना विश्वासात घेत तक्रार द्यायला लावली.

Murbad Crime : मुरबाडमध्ये तरुणांची 'मजा' बनली 'सजा', गंमतीशीर व्हिडीओ बनवल्यानं तरुणांना मारहाण
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 23, 2022 | 1:12 AM
Share

मुरबाड : तरुणांनी गंमत म्हणून तयार केलेल्या व्हिडिओनंतर तीन रिक्षाचालकांनी या तरुणांना बेदम मारहाण(Beaten) केल्याची घटना मुरबाड शहरात घडली आहे. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. मुरबाड शहरातील नमस्कार हॉलमध्ये महिनाभरापूर्वी एक कपड्यांचा सेल(Sale) लागला होता. या सेलमध्ये काही तरुणांनी गंमत म्हणून एक व्हिडीओ(Video) तयार केला होता. वास्तविक पाहता या व्हिडिओत काहीही आक्षेपार्ह नसताना तब्बल महिनाभरानंतर मुरबाडच्या रिक्षास्टॅंडवर दादागिरी करणाऱ्या कचरू टेकडे, विठ्ठल टेकडे आणि विशाल टेकडे या तिघांनी संबंधित तरुणांना बसस्टँड परिसरात बोलावून घेतलं. तिथे तुम्ही तयार केलेल्या व्हिडिओतून महिलांची छेड काढल्याचा दावा करत या तिघांनी व्हिडीओ तयार करणाऱ्या चार तरुणांना बेल्ट, दांडका आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर या मुलांना कान धरून उठाबशा काढायला लावल्या. (Youngsters beaten up for making funny videos in Murbad)

मारहाणीचा व्हिडिओ आरोपींकडून व्हायरल

तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ शूट करून तो या तीन गुंड रिक्षाचालकांनी व्हायरल केला. दुसरीकडे ज्या तरुणांना मारहाण करण्यात आली होती, ते तरुण मात्र घाबरून घरीच बसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी या तरुणांना शोधून काढलं आणि त्यांना विश्वासात घेत तक्रार द्यायला लावली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे गुंड रिक्षाचालक कचरू टेकडे, विठ्ठल टेकडे आणि विशाल टेकडे या तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

आरोपींच्या दादागिरी विरोधात नागरिकांच्याही तक्रारी

दरम्यान, कचरू टेकडे, विठ्ठल टेकडे आणि विशाल टेकडे हे तीन रिक्षाचालक गुंड प्रवृत्तीचे असून मुरबाड बसस्टँड परिसरात ते नेहमीच दादागिरी करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शिवाय ज्या व्हिडीओवरून या तिघांनी व्हिडीओ तयार करणाऱ्या तरुणांना मारहाण केली, त्या व्हिडीओत दिसणाऱ्या महिलांशी या तिघांचा कोणताही संबंध नसल्याचं सुद्धा समोर आलंय. त्यामुळं निव्वळ दहशत माजवण्यासाठी निष्पाप मुलांवर दादागिरी करणाऱ्यांना वेळीच धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. (Youngsters beaten up for making funny videos in Murbad)

इतर बातम्या

Satara Crime : साताऱ्यात 15 हजारांसाठी विकली दीड वर्षाची मुलगी? खाजगी सावकारीच्या संशयातून तपास सुरु

Dapoli Crime : दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश, पैशाच्या देवाण-घेवाण व्यवहारातून घडली घटना

Wardha : कदम डॉक्टरच्या घरातील ‘त्या’ खोलीत आढळला कुबेराचा खजिना, तब्बल 97 लाख 42 हजार हस्तगत

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली