अंधेरीत महिला वकिलासोबत ATMमध्ये घडला बाका प्रसंग! आधी त्यानं मागून डोक्याचा मुका घेतला, मग…

अंधेरीत महिला वकिलासोबत ATMमध्ये घडला बाका प्रसंग! आधी त्यानं मागून डोक्याचा मुका घेतला, मग...
सांकेतिक फोटो

20 जानेवारीला रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला वकील अंधेरी स्टेशनसमोरील एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेली होती, तिथे आरोपी आधीच हजर होता

गोविंद ठाकूर

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 22, 2022 | 11:35 PM

मुंबई : मुंबईच्या अंधेरी स्टेशनसमोर (Andheri Railway Station) असलेल्या एका एटीएममध्ये एक धक्कादायक घडना घडली. एका महिलेसोबत एटीएममध्ये बाका प्रसंग घडला. यावेळी एकानं महिलेसोबत एटीएममध्येच नको ते चाळे केले. त्यानंतर महिलेनं या इसमाला इंगा दाखवण्यास सुरुवात केली तेव्हा हा इसम महिलेची पर्स घेऊन पसार झाला. ही सगळी धक्कादायक घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Camera) कैद झाली आहे. पेशानं वकील असलेल्या या महिलेनं तत्काळ या प्रकराची पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर अंधेरी पोलिसांनी 24 तासांच्या आत संशयित आरोपीला बेड्या ठोकल्यात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेल्या घटनेचा व्हिडीओ पोलिसांनी (Andheri Police) तपासला. त्यानंतर चौकशी करत दिवसभराच्या आतच संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आधी पाठीमागून मुका आणि मग..

20 जानेवारीला रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला वकील अंधेरी स्टेशनसमोरील एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेली होती, तिथे आरोपी आधीच हजर होता. महिला वकिलाने एटीएममध्ये पैसे काढण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपीने महिलेच्या डोक्यात मागून मुका घेतला, त्यानंतर महिला वकिलाने तिला थप्पड मारण्यासाठी मागे वळली, तेव्हा आरोपीने महिला वकिलाची पर्स पळून गेला, महिला पाठलाग करत रस्त्यावर आली. तिला पकडायला पण तो त्या महिलेचा हात सोडवून पळून गेला.

कसून चौकशी सुरु

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एक महिला आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र आरोपी वकील महिलेची पर्स घेऊन पळून जातो. अटक करण्यात आलेल्या माथेफिरु आरोपीचे नाव अविनाश अशोक कासार असून त्याचं वय 29 वर्षे आहे.

पकडण्यात आलेला आरोपी जॉब करतो अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. अंधेरीचे पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. दरम्यान, सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी केली जात असून त्यानं अशाप्रकरणी आणखी किती लोकांना लुटलंय, याचा शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदी कलाकार पृथ्विकला लुटण्याचा प्रयत्न, थोडक्यात निभावलं! नेमकं काय घडलं?

बँकेत केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक

ठाण्यात डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, दीड महिन्यात चार बालकांचा मृत्यू


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें