AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : बँकेत केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक

विवेक सुनील सभरवाल(38) असे पहिल्या आरोपीचे आहे. तो लोन एजंट म्हणून काम करतो. सायबर पोलिसांनी त्याला दिल्ली येथून अटक केली आहे. बिरेनभाई शांतीलाल पटेल(33) असे दुसऱ्या आरोपीचे नाव असून त्याला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक करण्यात आली.

Mumbai Crime : बँकेत केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक
बँकेत केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 22, 2022 | 9:18 PM
Share

मुंबई : मुंबईतील कांदिवली पूर्व समता नगर सायबर सेल(Cyber Cell) पोलिसांच्या पथकाने अशा दोन आरोपींना अटक केली आहे, जे विलीन झालेल्या नवीन बँकेच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार करायचे. नंतर त्या बँकेच्या खातेदारांना केवायसी अपडेटसाठी कॉल करायचे आणि त्यानंतर बँकेच्या नावाने बनावट ईमेल आयडी(Fake Email Id) बनवून त्यांच्या खातेदारांची संपूर्ण कागदपत्रे मिळायची, ज्यामध्ये खातेदारांची सही असलेली कागदपत्रेही ठेवली जायची. नंतर खातेदाराच्या कागदपत्र आणि स्वाक्षरीच्या आधारे आरोपी बँकेला ईमेल करून त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करायचा. त्यानंतर ऑनलाईन बँकिंग सुरू करून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे. (Two accused arrested in bank fraud under KYC update)

बनावट ईमेलद्वारे इंटरनेट बँकिंग सुरु करुन पैसे लुटायचे

कांदिवली पूर्व समता नगर सायबर सेलच्या टीमने सांगितले की, मालाड सहकारी बँकेचे युनियन बँकेत विलीनीकरण केले जात आहे. याची माहिती आरोपींना मिळताच त्यांनी एका खातेदाराला फोन करून केवायसी अपडेट करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची नावे बँकेचे बनावट ईमेल बनवण्यात आले. ईमेल आयडीवर त्याचे संपूर्ण कागदपत्र मागवले, ज्यावर त्यांची स्वाक्षरीही होती. त्यानंतर खातेदाराचे कागदपत्र घेतल्यानंतर आरोपींनी खातेदाराच्या मोबाईल क्रमांकाच्या जागी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून बँकेत कागदपत्रासह मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी अर्ज ईमेल करून घेतला. त्याचे इंटरनेट बँकिंग सुरू करून तक्रारदाराच्या खात्यातून त्याच्या स्वत:च्या खात्यात 9 लाख रुपये ट्रान्सफर केले.

पोलीस आरोपींची सखोल चौकशी करीत आहेत

याप्रकरणी कांदिवली पूर्व समता नगर सायबर सेलने दोन आरोपींना अटक केली आहे. विवेक सुनील सभरवाल(38) असे पहिल्या आरोपीचे आहे. तो लोन एजंट म्हणून काम करतो. सायबर पोलिसांनी त्याला दिल्ली येथून अटक केली आहे. बिरेनभाई शांतीलाल पटेल(33) असे दुसऱ्या आरोपीचे नाव असून त्याला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी 9 मोबाईल फोन, 69 हजारांची रोकड आणि सरकारी कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून केवायसीच्या नावाखाली आणखी किती लोकांची फसवणूक केली याचा तपास सुरू आहे. (Two accused arrested in bank fraud under KYC update)

इतर बातम्या

Nagpur Crime : नागपूरमधील अॅसिड हल्ल्याची रुपाली चाकणकरांकडून दखल, पतीनेच केला हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

Thane : ठाण्यात डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, दीड महिन्यात चार बालकांचा मृत्यू

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?