Nagpur Crime : नागपूरमधील अॅसिड हल्ल्याची रुपाली चाकणकरांकडून दखल, पतीनेच केला हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

Nagpur Crime : नागपूरमधील अॅसिड हल्ल्याची रुपाली चाकणकरांकडून दखल, पतीनेच केला हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
नागपूरमधील अॅसिड हल्ल्याची रुपाली चाकणकरांकडून दखल

पीडित महिला आणि तिचा पती दोघेही गेल्या दोन वर्षापासून वेगळे राहत आहेत. आज सकाळी रामेश्वरी भागातून पीडिता सायकलवरुन जात असताना समोरुन बाईकवरुन आलेल्या पतीने तिच्यावर नळ फिटिंग करताना वापरल्या जाणारे केमिकल टाकले. सुरेश ठेंगणे (42) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

गजानन उमाटे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 22, 2022 | 8:43 PM

नागपूर : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर अॅसिड हल्ला(Acid Attack) केल्याची धक्कादायक घटना आज नागपूरमध्ये घडली होती. या अॅसिड हल्ल्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar)  यांनी दखल घेतली आहे. नागपूर जिल्ह्यात घरगुती वादातून पतीनं पत्नीवर अँसीड हल्ला केलाय. ही घटना निंदनीय आहे. याची राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. अॅसिड हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (State Women’s Commission chairperson Rupali Chakankar reacts to acid attack in Nagpur)

कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीवर हल्ला

नागपूरातील रामेश्वरी भागात एका महिलेवर आज सकाळी ॲसिड सदृश्य द्रव्याने हल्ला झाला होता. अजनी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटला घडली. पीडित महिला आणि तिचा पती दोघेही गेल्या दोन वर्षापासून वेगळे राहत आहेत. आज सकाळी रामेश्वरी भागातून पीडिता सायकलवरुन जात असताना समोरुन बाईकवरुन आलेल्या पतीने तिच्यावर नळ फिटिंग करताना वापरल्या जाणारे केमिकल टाकले. सुरेश ठेंगणे (42) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

महिलेची प्रकृती स्थिर

घटनेनंतर महिलेला तात्काळ जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घटनेच्या काही वेळातच नागपूर पोलीस ॲक्शनमोडमध्ये आले आणि त्यांनी आरोपी पतीला अटक केली. दरम्यान आरोपीने असे कृत्य का केले याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.

चार दिवसांपूर्वी बारामतीत तरुणीवर चाकूहल्ल्याची घटना उघडकीस

बारामती शहरातील पूर्वाकॉर्नर कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या, केसरी टूर्सच्या ऑफिसमध्ये पर्यटनाचे बुकिंग करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेतील हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस या संदर्भात अधिक तपास करीत आहेत. बारामती शहरातील केसरीच्या रजत टूर्सचे ऑफिस उघडल्यानंतर हा तरुण ऑफिसमध्ये आला. मी काल आपल्या ऑफिसला येऊन गेलो. परंतु आपण काल ऑफिस लवकर बंद केले असे म्हणत या आरोपीने महिलेच्या गळ्यात हात घातला तेव्हा या महिलेने आपली सोन्याची चेन चोरतोय की काय? म्हणून या महिलेने त्या आरोपीचा हात धरला नंतर या आरोपीने माझा हात सोड असे म्हणून त्याने हातावर चाकूचा वार करून तो पळून गेला. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो गाडीवर बसून पसार झाला. यासंदर्भात बारामती शहर पोलील पुढील तपास करीत आहेत. (State Women’s Commission chairperson Rupali Chakankar reacts to acid attack in Nagpur)

इतर बातम्या

Thane : ठाण्यात डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, दीड महिन्यात चार बालकांचा मृत्यू

मरतानाही एकमेकांना घट्ट धरून ठेवलं, वयोवृद्ध दाम्पत्यांचा एकमेकांना बिलगलेला मृतदेह पाहून काळजात चर्रर्र

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें