AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींनी केलेला सर्वात मोठा घोटाळा, भर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, यांच्या या ‘संभ्रम’ घोटाळ्याला…

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या घोटाळ्या विषयी भाष्य केले....

मोदींनी केलेला सर्वात मोठा घोटाळा, भर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, यांच्या या 'संभ्रम' घोटाळ्याला...
Uddhav Thackeray
| Updated on: Oct 20, 2026 | 9:30 PM
Share

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की मी आधीही बोललो होतो की युतीत राहून आमची २५ वर्षे सडली आहेत. हो आपण खोटी माणसे डोक्यावर घेतो.ही जेन – झी म्हणजे कमालच आहे. आम्ही सर्वप्रथम देशातील पहिली संघटना असले ज्यांनी अभिजीत दीपकेंना जाहीर पाठींबा दिला.अजूनही आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या घोटाळ्या विषयी भाष्य केले….

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की तुम्ही खासदारांना फोडण्यासाठी पन्नास कोटी खर्च केले. आणि जो शेतकरी पोटाची खळगी भरतोय त्यांना तुम्ही पाच हजार रुपये नुकसान भरपाई देता. काय तुमची लायकी. हे खासदार फुटले तेव्हा मिनिटा-मिनिटांना त्याची बातमी चालवली जात होती. आता येथे गेले, आता येथे उतरले. आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाच हजार रुपये पुसले तेव्हा त्याची बातमी झाली नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत सांगितले होते की ऑपरेशन सिंदूर मध्ये एकही सैनिकाचा मृत्यू झालेला नाही. आणि एक वर्षानंतर सहा सैनिक धारातिर्थीत पडल्याची बातमी कळते हे किती दुर्दैवी आहे असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की या जेन – झीच्या आंदोलक असहाय तरुण मुलींना गळ्यात भगवी उपरणे घालून मारहाण करणारे हिंदूत्व नाही. तुम्ही हिंदुत्वाला नासवत आहेत. १२ वर्षे ठाण मांडून बसलाय. अजूनही हिंदू खतरेमे असे तुम्ही कसे काय म्हणत आहेत. तुम्ही म्हणजे हिंदू नाहीत.तुम्ही हिंदूंचा मक्ता घेतलेला नाही. जो हिंदू शिवसेना प्रमुखाने जागवला त्याचा फायदा तुम्ही घेऊन सत्तेवर आलात.

आपण काँग्रेसच्या घोटाळ्याचे घोटाळे ऐकत आला आहात. इतक्या वर्षात भाजापाने केलेला सर्वात मोठा घोटाळा तुम्हाला माहिती आहे काय ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. यांचे  “संभ्रम घोटाळे” असेच आहेत. निवडणूकीत आम्ही सगळे उभे रहातोय, मी तुम्हाला चंद्रावर घर देतो असे आश्वासन दिले तर काय होईल, तुम्हालाही माहिती आहे की चंद्रावर घर देणे शक्य नाही. तरी तुम्ही मत देताना एकदा देऊन तर बघू काय करतो?  हा ५६ इंचाचा हेच सांगतोय, ५६ इंच की किती माहिती नाही. अशीच स्वप्नं दाखवायची. जी पूर्ण करणे शक्य नाही. आपण काही तरी अलौकीक आहोत, अशा पद्धतीने स्वत:बद्दल संभ्रम निर्माण करायचे आणि विरोधकांची बदनामी करायची असे यांचे धोरण असल्याची टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही. तोपर्यंत येथेच्छ बदनामी करायची आणि विरोधकांना जीवनातून उठवायचे. मनमोहन सिंह यांच्यावर केलेल्या आरोपाचा खटला ते वारल्यानंतर दोन वर्षांनी लागला आणि ते त्यात निर्दोष सुटले. परंतू या राममंदिराच्या चंपत रायला १०५ सीसीटीव्ही पुरावे असूनही क्लीन चिट मिळाली.

२५ वर्षे यांच्याबरोबर युतीत सडली

अशी ही नालायक माणसे, २५ वर्षे यांच्याबरोबर युतीत सडली असे मी उगाच म्हणालो नव्हतो असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ही खोटी माणसे आपण डोक्यावर घेतो. ही जेन झी म्हणजे कमाल आहे. आमची पहिली संघटना असेल ज्यांनी अभिजीत दीपकेंना पाठींबा दिला असेल. जेन झीचे मिम्स खूपच चांगले आहे. त्यात दोन मित्र चर्चा करताना दाखवले आहेत. पहिला देश कैसा था. पहिले मंदिर बनाते थे, उपर वाले लुटते थे. आता आत्मनिर्भर झालोत, मंदिर देखील आपणच बनवतो आणि लुटतो देखील आपणच !

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!