
सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. सोलापुरात एकाच स्कार्फनं गळफास घेऊन तरुण आणि तरुणीनं आपलं जीवन संपवलं आहे. सोलापुरातल्या कर्णिक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याच कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुण-तरुणीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहिली आहे, त्या चिठ्ठीमध्ये आम्ही बहीण-भाऊ आहोत असा उल्लेख आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच स्कार्फनं गळफास घेऊन तरुण आणि तरुणीनं आपलं जीवन संपवलं आहे. सोलापुरातल्या कर्णिक नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुण रोहित ठणकेदार आणि तरुणी अश्विनी केशापुरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे, त्या चिठ्ठीमध्ये आपण बहीण भाऊ असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
‘आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत, त्यामुळे आत्महत्या केल्यानंतर आमच्यावर शंका घेऊ नका’ असा मजकूर या चिठ्ठीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित ठणकेदार हा चालक म्हणून काम करतं होता, तर अश्विनी ही कर्नाटकातील एका महाविद्यालायत बी फार्मसीचे शिक्षण घेत होती. दरम्यान दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात प्रचंड आक्रोश व्यक्त केला, याप्रकरणाची सिव्हील हॉस्पिटल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे, आत्महत्येचं नेमकं कारण काय असावं? याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान अश्विनीने रोहितची ओळख कुटुंबियांना मानलेला भाऊ अशीच करून दिली होती. मात्र रोहित याच्या कुटुंबियांना अश्विनी बद्दल कोणतीही माहिती नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नसल्यामुळे या घटनेचं गुढ वाढलं आहे, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.