त्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी, स्वीकृत सदस्य निवडीत पक्षादेश डावलल्याने कारवाई..
...असे प्रकार पक्ष कधी ही खपवून घेणार नाही.या स्वीकृत नगरसेवक निवडी विरोधात आम्ही कायदेशीर लढाई देऊ अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी दिली आहे.

केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासूनच खासदार, आमदार आणि नगरसेवक हे आपला पक्ष सोडून भाजपात सामील होण्यात नशीब मानत आहेत. या पक्षांतरामुळे पक्षनिष्ठा आणि कठ्ठर कार्यकर्त्यांची कमी होत चालली आहे. असाच काहीसा प्रकार भिवंडी नगर पालिकेत घडला आहे. येथे भिवंडी पालिकेत स्वीकृत सदस्य निवडीत पक्षादेश झुगारुन समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी भाजपाला मदत करीत पक्षा बाहेरचा उमेदवार निवडून दिल्याने खळबळ उडाली आहे.
भिवंडी पालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीमध्ये समाजवादी पक्षाने दिलेला पक्षादेश नाकारत समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांनी आपली हक्कालपट्टी करवून घेतली आहे. समाजवादी पक्षाचा आदेश डावलून पालिकेतील पक्षाचे गटनेते आरिफ याकूब शेख यांनी आणि सहा नगर सेवकांनी स्वत:ची पक्षाबाहेरील भाजपा आमदार महेश चौघुले यांचे खंदे समर्थक असलेल्या भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस महासभेत करून निवड जाहीर केली आली. यानंतर प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांच्या आदेशा नुसार शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी समाजवादी पक्षाच्या सहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
समाजवादी पक्षात खळबळ
समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते आरिफ याकूब शेख यांनी पक्षाबाहेरील,भाजपा आमदार महेश चौघुले यांचे खंदे समर्थक असलेल्या भरत जंगलानी यांच्या नावाची शिफारस महासभेत करून निवड जाहीर केली. त्यामुळे समाजवादी पक्षात खळबळ माजली आहे.यानंतर प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या आदेशा नुसार शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी समाजवादी पक्षाच्या सहा नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये पक्षाचे गटनेता आरिफ शेख, काशफी शाफ मोमिन, आजीब जमाल मोमिन, अन्सारी शबाना शमीम, शेख सलमाबानो मोहम्मद अक्रम, खान अमान उबैद अशी हकलपट्टी केलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. पक्षाच्या बळावर निवडणून आलेल्या नगरसेवकांनी पक्षासोबत गद्दारी केली आहे. हे पक्ष कधी ही खपवून घेणार नाही. या स्वीकृत नगरसेवक निवडी विरोधात आम्ही कायदेशीर लढाई देऊ अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी दिली आहे.
