AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff Firing Case: या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये अल्पवयीन आरोपी नाही, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

Mumbai Police Press Conference: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर दुचाकीवरून आलेल्या काही व्यक्तीने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यानंतर आज मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

Tiger Shroff Firing Case: या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये अल्पवयीन आरोपी नाही, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
| Updated on: Oct 19, 2026 | 6:18 PM
Share

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अभिनेत्यावर तीन बाईकस्वारांनी हल्ला केला होता. अंदाजे ५ गोळ्या झाडण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेतले आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच आरोपीचा तपास कसा लागला, याबाबत माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराने सर्वांना धक्का बसला आहे. हा हल्ला रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील जुहू येथील पुष्पा पार्कमध्ये झाला. अभिनेता फुटबॉलच्या सामन्यावरून घरी परतत असताना तीन बाईकस्वारांनी त्याच्यावर समोरून हल्ला केला. या अंदाधुंद गोळीबारात त्याचा चालक फिरदौस जखमी झाला आणि उमेश नावाच्या ऑटोचालकाच्या छातीत गोळी लागली.

यानंतर टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना कोटा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थानमधील कोटा पोलिसांनी मुंबई पोलिसांना सहकार्य करून त्यांना पकडण्यास मदत केली. हल्ल्यापूर्वी हल्लेखोरांनी घराची आणि फुटबॉल मैदानाची पाहणी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत आरोपींबाबत मोठा खुलासा केला आहे. तसेच राजस्थान पोलिसानी पत्रकार परिषदेत एक आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितलं होते. तो दावा मुंबई पोलिसानी खोडून काढला आहे.

पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्यावर ५ राऊंड फायर करण्यात आले आहे. तिन्ही आरोपींमध्ये कुणीही अल्पवयीन नाही आहे. त्यातील दोघांची वय १८ वर्ष आहे. तर एकाचे वय २२ वर्ष आहे. आरोपींवर मुंबईत गोळीबार करण्यात आला. काही तासांतच ते गुजरातमध्ये दिसले. दिल्ली आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली.

गुन्हे शाखेने सांगितले की, टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेच्या तपासासाठी २० पथके तयार करण्यात आली आहेत. हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी कोणीही अल्पवयीन नाही. सर्वजण प्रौढ आहेत.

Follow Us
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप