AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff News: टायगर श्रॉफवर गोळीबार का झाला? पोलिसांनी शोधून काढलं कारण

Tiger shroff case : टायगर श्रॉफ जुहूमध्ये झालेल्या गोळीबारातून थोडक्यात बचावला. आता त्याच्यावर गोळीबार का करण्यात आला, याचं कारण पोलिसांनी शोधून काढलं आहे.

Tiger Shroff News: टायगर श्रॉफवर गोळीबार का झाला? पोलिसांनी शोधून काढलं कारण
tiger shroff caseImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 9:34 AM
Share

मुंबईतील जुहूमध्ये अभिनेता टायगर श्रॉफवर धडाधड गोळ्या झाडल्यानंतर आता पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. गोळीबारानंतर महाराष्ट्राबाहेर पळून गेलेल्या शार्प शुटरच्या मुसक्या आवळण्यास यश आलं. आता पोलिसांनी आरोपीच्या विरोधात चौकशीचा धडाका लावला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे.  आरोपींनी टायगर श्रॉफवर केलेल्या गोळीबाराचं कारण देखील पोलिसांनी शोधून काढलं आहे.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी आता मोठी अपडेट हाती आली आहे. टायगर श्रॉफवरील गोळीबारामागे आर्थिक फायदा, दहशत निर्माण करणे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशातून गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा देखील उल्लेख आहे. त्यानंतर टायगर श्रॉफ हल्ल्याचा संबंध सलमान खान गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील कथित हेतूंशी जोडण्यात आलाय.  हरियाणातील सोनीपत येथून अटक केलेल्या तिघांना मुंबई पोलिसांनी न्यायालयात हजर केले. आरोपींचा वॉन्टेड आरोपी अनिल पंडित याच्याशी संपर्क असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. हल्ल्यानंतर आरोपी परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हॉटेलमध्ये गोळीबाराचा सराव करताना झालेल्या मिसफायरची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. सध्या न्यायालयाने तिन्ही आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टायगरवर गोळ्या झाडताच शार्प शूटरला काय मेसेज मिळाला? 

टायगर श्रॉफवरील  गोळीबारानंतर शूटर्सना फोन आणि मेसेजद्वारे अपडेट्स मिळत होते. बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट पाहून आरोपींना पोलिसांच्या तपासाची अपडेट्स वेळोवेळी दिली जात होती, अशी माहिती समोर आली आहे. आरोपींचे फोटो टीव्हीवर झळकताच एका शूटरला  ‘चेहरे आ गए हैं, निकल जाओ’, असा मेसेज हँडलरने केल्याचे समोर आलं.  हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला.  मात्र त्याचा ड्रायव्हर आणि व्लॉगर जखमी झाले. या गोळीबार प्रकरणात पूल सिंग, रेहान अन्सारी आणि रिथिक महतो यांना अटक करण्यात आली आहे.  तर एकूण आरोपींची संख्या १० इतकी आहे. शूटर्सना अपडेट्स देणारा व्यक्ती लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे का, याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…