AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Morcha : आम्ही शेवटची लढाई लढतोय, आता ओबीसी..आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा एल्गार

OBC Morcha : अंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार आहे.

OBC Morcha : आम्ही शेवटची लढाई लढतोय, आता ओबीसी..आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा एल्गार
Laxman Hake
| Updated on: Sep 01, 2026 | 7:29 AM
Share

अंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा निघणार आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून ओबीसींना मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात असून ते संपून जाण्याची भिती आहे. म्हणून लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाची हाक देण्यात आली आहे. कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्या समाजाला आरक्षण देणार नाही ही सरकारची भूमिका आहे. सरकारने तसं अनेकदा सांगितलं देखील आहे. कुणबी समाज हा ओबीसीमध्ये येतो. ज्या मराठ्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. ती सरकारने मान्य देखील केली आहे. पण जात पडताळणीत काही नोंदी रद्द झाल्या आहेत. यावर मनोज जरांगेंचा आक्षेप आहे. त्यासाठी त्यांचं आमरण उपोषण सुरु आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड-पाटस येथील टोल नाक्यावरुन हा ओबीसी आक्रोश मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार आहे. ओबीसींच्या आझाद मैदानावरील मोर्चाला शासनाने परवानगी दिलेली नाही. “महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातींचा गाड्यांचा ताफा मुंबईकडे जाईल. मुंबईकडे जाताना डायव्हर्जन कसं असेल, वाहनं किती येतील असे प्रश्न आम्हाला पुण्याच्या एसपींनी विचारले. ती त्यांची जबाबदारी आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आमचं आंदोलन मुंबईच्या दिशेने घेऊन जात आहोत” असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं.

आरक्षण संपल्यात जमा आहे

“आम्हाला परवानगी मिळो अथवा न मिळो. या शासनाने आमचं आरक्षण घालवलय. यांच्याकडून परवानगीची अपेक्षा काय करणार?. आम्ही शेवटची लढाई लढतोय. आता ओबीसी समाजबांधव रस्त्यावर उतरला नाही, तर यापुढे आंदोलन होणार नाही. आरक्षण संपल्यात जमा आहे. एसपींनी आमच्याशी चर्चा केली. कोणतही आश्वासन दिलं नाही” असं मुंबईच्या दिशेने रवाना होण्यााधी लक्ष्मण हाके यांनी सांगितलं.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा