महाराष्ट्रात 2115 जण कोरोनामुक्त, एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजार 974 वर

राज्यात आज (3 मे) कोरोनाच्या नवीन 678 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या 12 हजार 974 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

महाराष्ट्रात 2115 जण कोरोनामुक्त, एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजार 974 वर
Follow us
| Updated on: May 03, 2020 | 10:25 PM

मुंबई : राज्यात आज (3 मे) कोरोनाच्या नवीन 678 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या 12 हजार 974 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आज दिवसभरात 115 कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात 2115 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 10 हजार 311 कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 1 लाख 70 हजार 139 नमुन्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी 1 लाख 56 हजार 78 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले, तर 12 हजार 974 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 1 लाख 81 हजार 382 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 13 हजार 158 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण मृतांची संख्या 548 झाली आहे. आज झालेल्या मृतांमध्ये मुंबईमधील 21, पुण्यातील 4, भिवंडीतील 1, नवी मुंबईमधील एकाचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरुष तर 11 महिला आहेत. या 27 मृत्यूंपैकी 14 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील वयाचे आहेत. 10 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षांखालील आहे. या 27 रुग्णांपैकी 13 जणांमध्ये (48 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 997 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 11 हजार 78 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 51.05 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

Navi Mumbai Corona : नवी मुंबईत एकाच दिवसात 25 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 300 पार

‘टीव्ही 9’ इम्पॅक्ट : एपीएमसीत हजारो कामगारांची कोरोना चाचणी, आणखी 59 जणांना लक्षणं

राज्यात जीवनावश्यक नसलेल्या दुकानांना सशर्त परवानगी, मुंबई-पुण्यातील निर्बंध कायम

Lockdown : लॉकडाऊनमध्ये राज्यात 91 हजार गुन्हे, 3 कोटी 25 लाखांचा दंड

Total Corona Patient in Maharashtra

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.