महाराष्ट्रात 3 हजार 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 85 हजार 975 वर

महाराष्ट्रात आज 3 हजार 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 85 हजार 975 वर पोहचला आहे (Total Corona Patient in Maharashtra).

महाराष्ट्रात 3 हजार 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, एकूण आकडा 85 हजार 975 वर
Follow us
| Updated on: Jun 07, 2020 | 11:40 PM

मुंबई : महाराष्ट्रात आज 3 हजार 7 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 85 हजार 975 वर पोहचला आहे (Total Corona Patient in Maharashtra). यापैकी एकूण 39 हजार 314 रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात 43 हजार 591 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 5 लाख 51 हजार 647 नमुन्यांपैकी 85 हजार 975 नमुने कोरोना पॉझिटिव्ह (15.58 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 58 हजार 463 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 77 हजार 654 खाटा उपलब्ध आहेत. यात सध्या 28 हजार 504 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 91 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये आरोग्य मंडळ निहाय ठाण्यातील – 71 (मुंबई 61, उल्हासनगर 5, मीरा-भाईंदर 4, पालघर 1), नाशिकमध्ये 1 (नाशिक 1), पुणे- 14 (पुणे 6, सोलापूर 8), कोल्हापूर- 2 (कोल्हापूर 2), औरंगाबाद-1 (जालना 1), अकोला-1 (अकोला मनपा 1), इतर राज्य- 1 (पश्चिम बंगाममधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला). जणांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 64 पुरुष, तर 27 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 91 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 46 रुग्ण आहेत, तर 41 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 जण 40 वर्षांखालील आहेत.

या 91 रुग्णांपैकी 67 जणांमध्ये (73.6 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 3 हजार 60 झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 31 मृत्यू हे मागील 2 दिवसांतील आहेत, तर उर्वरित मृत्यू 13 एप्रिल ते 4 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 60 मृत्यूंपैकी मुंबई 44, उल्हासनगर -5, मीरा भाईंदर – 4,सोलापूर 4, नाशिक – 1, पालघर – 1, इतर राज्ये – 1 असे मृत्यू आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3654 झोन क्रियाशील आहेत. यात आज एकूण 18 हजार 515 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 69.60 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

ठाण्यात चुकीचे कोरोना रिपोर्ट देणाऱ्या प्रयोगशाळेवर बंदी, तर अव्वाच्या सव्वा बिल घेणाऱ्या रुग्णालयांना 16 लाखांचा दंड

Home Isolation | सौम्य लक्षणे असलेल्या ‘कोरोना’ रुग्णांचे आता घरात विलगीकरण शक्य

निवृत्तीनंतर महिन्याभरात पायलटचा मृत्यू, कोरोनाच्या भीतीने 200 क्रू मेम्बर्स क्वारंटाईन

Total Corona Patient in Maharashtra

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.