निवृत्तीनंतर महिन्याभरात पायलटचा मृत्यू, कोरोनाच्या भीतीने 200 क्रू मेम्बर्स क्वारंटाईन

कोरोनाची लक्षणं असणाऱ्या 3 ते 4 जणांना, हलके लक्षणं असणाऱ्या 30 ते 40 जणांना आणि 150 पायलट आणि केबिन क्रू मेम्बर्सना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

निवृत्तीनंतर महिन्याभरात पायलटचा मृत्यू, कोरोनाच्या भीतीने 200 क्रू मेम्बर्स क्वारंटाईन

नवी दिल्ली : एयर इंडिया एअरलाईन्सच्या (Air India) निवृत्त पायलटचा (Retired Air India Pilot Died Due To Corona Virus) कोरोनाने मृत्यू झाल्याचा संशय आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हा पायलट जवळपास महिन्याभरापूर्वी निवृत्त झाला होता. त्यानंतर या एअरलाईन्सच्या जवळपास 200 क्रू मेम्बर्सना क्वारंटाईन करण्यात (Retired Air India Pilot Died Due To Corona Virus) आलं आहे.

एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यानुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरिस 58 वर्षीय वरिष्ठ कॅप्टन निवृत्त झाले होते. त्यांनी एअरबस ए- 320 चं संचालनही केलं होतं. त्यांनी DGCA मध्ये फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर म्हणूननही काम पाहिलं होतं.

एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यानुसार, कोरोनाची लक्षणं असणाऱ्या 3 ते 4 जणांना, हलके लक्षणं असणाऱ्या 30 ते 40 जणांना आणि 150 पायलट आणि केबिन क्रू मेम्बर्सना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आतापर्यंत, सुमारे 200 केबिन क्रू मेम्बर्सना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. यावेळी कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे, ही चिंतेची बाब आहे, असंही त्यांनी सांगितलं (Retired Air India Pilot Died Due To Corona Virus).

पायलट असोसिएशनचे व्यवस्थापनाला पत्र

31 मे रोजी कमर्शियल पायलट असोसिएशनने व्यवस्थापनाला एक पत्र लिहिलं. “सर, तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की, आम्ही ‘नॅशनल ड्यूटी’च्या रुपात वंदे भारत मिशनअंतर्गत उड्डाणांचं संचालन करत आहोत. ऑपरेटिंग चालक दलाला मिळणारी ट्रीटमेंट वाईट असो. आम्ही आमच्या चालकांना मिळणाऱ्या वागणुकीने असमाधानी आहोत. येणाऱ्या काळात आवश्यक सेवांवेळी आम्ही कुठलंही उड्डाण करण्याच्या स्थितीत नसू”, असं या पत्रात सांगण्यात आलं आहे.

Retired Air India Pilot Died Due To Corona Virus

संबंधित बातम्या :

राजधानीत अधिक मोकळीक, दिल्लीच्या सीमा खुल्या, रेस्टॉरंट-मॉलही उघडणार

पैशांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो का? ‘कॅट’चं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र

ऑफिस, हॉटेल, रेस्टॉरन्ट, धार्मिक स्थळं 8 जूनपासून सुरु होणार, गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर

Atlas Cycles | सायकल दिनीच ‘अ‍ॅटलास’ खिळखिळी, 40 लाख सायकल बनवणाऱ्या कंपनीचे उत्पादन बंद

Published On - 5:18 pm, Sun, 7 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI