राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1574 वर, एकाच दिवशी 210 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आज (10 एप्रिल) कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1574 वर, एकाच दिवशी 210 नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात आज (10 एप्रिल) कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). यातील काहिसा दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 188 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1176 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत कोरोना चाचणीसाठी एकूण 33 हजार 93 नमुने पाठवण्यात आले. यापैकी 30 हजार 477 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 1574 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 188 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 38 हजार 927 व्यक्ती घरगुती विलगीकरणात आहेत, तर 4738 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे 10 तर पुणे, पनवेल आणि वसई विरार येथील प्रत्येकी 1 आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 9 पुरुष तर 4 महिला आहेत. आजच्या एकूण 13 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत. 5 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत, तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 11 रुग्णांमध्ये (85 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोरोना रुग्णांची अद्ययावत माहिती:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

पुण्यात कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार कसे करायचे? दीपक म्हैसेकरांच्या महत्त्वाच्या सूचना

नॉट रिचेबल बड्या नेत्याला फडणवीसांनी तात्काळ शोधलं होतं, अजित पवारांचा उल्लेख टाळत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

सचिवांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन वाधवान यांना सहलीसाठी पत्र दिलं? : राधाकृष्ण विखे पाटील

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय? प्रत्येक हॉटस्पॉटची संपूर्ण माहिती

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा करा, आरोग्यमंत्र्यांची केंद्र शासनाकडे मागणी

Corona : देशातील कोरोना रुग्णांची संख्या 6761 वर, तर 206 जणांचा मृत्यू

Total Corona Patient in Maharashtra

Published On - 11:00 pm, Fri, 10 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI