देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय? प्रत्येक हॉटस्पॉटची संपूर्ण माहिती

एकट्या मुंबईत आतापर्यंत 876 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यात 54 जणांचा मृत्यू झाला आहे (Details of every Corona Hotspot in Mumbai).

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय? प्रत्येक हॉटस्पॉटची संपूर्ण माहिती

मुंबई : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेलं ठिकाण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. एकट्या मुंबईत आतापर्यंत 876 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यात 54 जणांचा मृत्यू झाला आहे (Details of every Corona Hotspot in Mumbai). त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्कपणे काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून कोरोना संसर्गाच्या प्रमाणानुसार मुंबईत काही हॉटस्पॉट ठरवण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने परिसर सील बंदही केला आहे.

मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट लक्षात घेता राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनानं मुंबईतील चार विभाग हे अतिगंभीर म्हणून घोषित केले आहेत. यापैकी जी साऊथमध्ये लोअर परेल आणि वरळीचा परिसर, ई वॉर्डमध्ये भायखळा, भायखळा फायर ब्रिगेड आणि आसपासचा भाग, डी वॉर्डमध्ये नाना चौक ते मलबार हिल परिसर आणि के वेस्ट वार्डात अंधेरी पश्चिमचा भाग यांचा समावेश आहे. आता हे चारही विभाग संपूर्णपणे सील करण्यात आले आहेत.


मुंबईच्या जी साऊथ वार्डातील कोरोना रुग्णांची संख्या 199 पर्यंत पोहचली आहे. ई वार्डात 69, डी वार्डात 61, के वेस्ट वार्डात 51 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणांकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, आज (10 एप्रिल) महाराष्ट्रात 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 364 वरुन 1 हजार 380 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 16 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 380 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर आणि ग्रामीण, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई94146656225335
पुणे (शहर+ग्रामीण)40180168571127
ठाणे (शहर+ग्रामीण)63778276421705
पालघर 100784967194
रायगड88654174164
रत्नागिरी88461030
सिंधुदुर्ग2622175
सातारा1780102868
सांगली66235018
नाशिक (शहर +ग्रामीण)73164209300
अहमदनगर (शहर+ग्रामीण)89455622
धुळे152386078
जळगाव 60303508353
नंदूरबार 27914911
सोलापूर43132161351
कोल्हापूर 122082220
औरंगाबाद84324304341
जालना108357147
हिंगोली 3422792
परभणी2141035
लातूर 71933635
उस्मानाबाद 39524617
बीड2351185
नांदेड 60625224
अकोला 1876149894
अमरावती 85864037
यवतमाळ 44829114
बुलडाणा 4121616
वाशिम 1951065
नागपूर2034138722
वर्धा 34141
भंडारा162891
गोंदिया 2161563
चंद्रपूर177980
गडचिरोली115711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)202031
एकूण26092414450710482

संबंधित बातम्या :

दोन परिचारिकांना ‘कोरोना’, दादरचे शुश्रुषा रुग्णालय सील करण्याचे मुंबई महापालिकेचे आदेश

दादरमध्ये ‘कोरोना’चे तीन नवे रुग्ण, दोन नर्सना लागण, धारावीत आणखी पाच कोरोनाग्रस्त सापडले

लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाला पर्यटनासाठी मेहरबानी, प्रधान सचिवांना सक्तीची रजा, गृहमंत्र्यांची कारवाई

Details of every Corona Hotspot in Mumbai

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *