AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रक चालकाचे अपहरण? पोलिसांशी अरेरावी, वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या आईचा आणखी एक प्रताप, नेमकं काय घडलं?

मुंबईतील ऐरोली येथून एका ट्रक चालकाचे अपहरण झाले होते. हा चालक आता पूजा खेडकर यांच्या पुण्यातील चतुश्रृंगी भागातील घरी आढळला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रक चालकाचे अपहरण? पोलिसांशी अरेरावी, वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या आईचा आणखी एक प्रताप, नेमकं काय घडलं?
Pooja Khedkar Mother
| Updated on: Sep 14, 2025 | 6:55 PM
Share

काही महिन्यांपूर्वी वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांची आई चर्चेत आली होती. पूजा यांच्या आईचा हातात बंदूक घेऊन दमदाटी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईतील ऐरोली येथून एका ट्रक चालकाचे अपहरण झाले होते. हा चालक आता पूजा खेडकर यांच्या पुण्यातील चतुश्रृंगी भागातील घरी आढळला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली माहिती

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्वीट करत या प्रकरणाची माहिती दिली आहे. विजय कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप पुढे आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय 22 राहणार तुर्भे एमआयडीसी नवी मुंबई हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात असताना कार क्रमांक एम एच 12आर टी 5000 या कारला मिक्सरचा धक्का लागल्याने कार मधील दोघांनी त्याला जबरदस्ती ने आपल्या कारमध्ये नेऊन त्याचे अपहरण केल्याबाबत तक्रार दिल्याने रबाळे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.’

अपहरण केलेला चालकाची सुटका

विजय कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे कारचा मागोवा घेत पुणे येथे गेले असता सदरची कार ही वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतुश्रृंगी हद्दीतील घरी मिळून आली. तेथून अपहरण केलेला चालक याची एपीआय खरात व त्यांच्या टीमने सुटका केली. तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवी पणा केला व दरवाजा न खोलताच पोलिसांशी हुज्जत घातलेली आहे. पोलिसांनी त्यांना रबाळे पोलीस स्टेशन येथे येण्याची सूचना केली असून पुढील तपास चालू आहे.’

दरम्यान, आता पोलीसांनी या घटनेचा सखोल तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाचा काय संबंध आहे हे शोधले जाणार आहे. याआधीही पूजा खेडकर यांच्या आईने दादागिरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या अपहरण प्रकरणातही खेडकर यांची अडचण वाढणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...