AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये किळसवाणा प्रकार; तुकाराम मुंढेंचं डिपार्टमेंट अॅक्शन मोडमध्ये, तपासणीत धक्कादायक बाबी समोर!

सावित्रीबाई फुले विद्यापिठामध्ये असा प्रकार घडला आहे, ज्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने त्याची दखल घेतली आहे. तपासणी केली आहे, विद्यार्थिनींसोबत नेमकं नेमकं काय घडलेलं?

पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये किळसवाणा प्रकार; तुकाराम मुंढेंचं डिपार्टमेंट अॅक्शन मोडमध्ये, तपासणीत धक्कादायक बाबी समोर!
tukaram mundhe fda action in savitribai phule university puneImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 7:32 PM
Share

दीपक कापरे, पुणे टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृाहमध्ये अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अन्न सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभा ठाकलं आहे. भाजीमध्ये प्लास्टिक आढळळ्याच्या घटनेनंतर सातत्याने विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या पदार्थांमध्ये किडे आढळून आले. या संतापजनक प्रकाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे मदत मागितली. अनेक निवेदनानंतर त्यांनी आज एफडीएने दखल घेतली असून वसतिगृहाची तपासणी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृह मेसमध्ये वारंवार घडणाऱ्या अन्नसुरक्षेसंदर्भातील घटनांची दखल घेत आज अन्न व औषध प्रशासन (FDA), पुणे यांच्या पथकाने तपासणी केली. फूड इन्स्पेक्टर अजिंक्य उमाप यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांत मेसमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामध्ये सप्टेंबर मध्यात जेवणामध्ये किडा आढळल्याची घटना घडली होती.

एकूण घटनाक्रम

२९–३० सप्टेंबर : भाजीमध्ये प्लास्टिक आढळल्याची तक्रार २ ऑक्टोबर : नाश्त्यातील पोह्यामध्ये किडा आढळला ३ ऑक्टोबर : पुन्हा पोह्यामध्ये किडा आढळला ४–५ ऑक्टोबर : भाजीमध्ये धातूची तार आढळल्याची नोंद

या घटनांविरोधात विद्यार्थिनी, विद्यार्थी संघटना आणि विविध प्रसारमाध्यमांनी सातत्याने आवाज उठवला होता. तसेच अनेक निवेदने, तक्रारी आणि पाठपुराव्यानंतर FDA ने प्रत्यक्ष तपासणी केली.

किडे, प्लास्टिक आणि तार प्रकरणाची FDA कडून दखल

त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ सुरु असणाऱ्या अशा गंभीर घटना कधी थांबणार असा प्रश्न उभा राहतोय. पण आता पुढे या प्रकरणामध्ये पुढे काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये एफडीएने अनेक कारवाया करत धडक कारवायांचं सत्र राबवलं आहे. यामध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकून त्यामध्ये अनेक गुन्हे दाखल करुन संबंधितांच्या अटकाही झाल्या आहेत. पण याप्रकरणामध्ये विद्यार्थ्यांना अनेकवेळा पाठपुरावा करावा लागला. त्यानंतर आता एफडीएने कारवाईची भूमिका घेतली आहेत. त्यामुळे पुढे आता कोणती कठोर कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागलं आहे.

Follow Us
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?