मुंबई – नाशिक महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, मध्यरात्री 4 तास हायवे रोखला

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:30 AM, 11 May 2019
मुंबई - नाशिक महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, मध्यरात्री 4 तास हायवे रोखला

शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ काल रात्री बाराच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी दोन भीषण अपघात घडले. या अपघातातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. बाळू घावत (40) आणि बंटी बेलवले अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी चार तास रास्ता रोको केला.

मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर येथील कांबारे क्रॉसिंगजवळ काल रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात बाळू घावत या 40 वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाला.

तर मुंबई-नाशिक महामार्गावरील वाशिंद क्रॉसिंगला एका टँकरच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकीला झायलो कारने जोरात धडक दिली. या धडकेमुळे बंटी बेलवले या दुचाकीस्वार टँकरखाली गेला. त्यामुळे बंटी बेलवले या तरुणाचाही अपघातात मृत्यू झाला.

काल रात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर नागरिकांनी महामार्गावरील गाड्यांची तोडफोड केली. तसंच या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मुंबई नाशिक महामार्ग  चार तास रोखून धरला होता.

दरम्यान शुक्रवारी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. यात 6 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.