मध्य रेल्वेच्या सकाळच्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम सायंकाळीही, कामावरुन घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल

मध्य रेल्वेवर एकाच दिवशी दोन बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. सकाळी लागोपाठ दोन तांत्रिक बिघाडाने लोकलचे सेवेचे घसरलेले वेळापत्रक रात्री उशीराही सुरळीत झालेले नाही..

मध्य रेल्वेच्या सकाळच्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम सायंकाळीही, कामावरुन घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल
Central Railway local services disrupted
| Updated on: Oct 26, 2026 | 5:56 PM

मध्य रेल्वेच्या कांजूर मार्ग स्थानकाच्या दरम्यान सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास तांत्रिक बिघाडाने सिग्नल बिघाडाची मालिका सुरु झाली. त्यामुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्यातच दिवशी मुंबईकरांना लेटमार्कचा फटका बसला. या तांत्रिक बिघाडानंतर सायंकाळी उशीरापर्यंत मध्य रेल्वेचे घसरलेले वेळापत्रक काही सुरळीत होऊ शकले नाही. त्यामुळे सायंकाळी कामावरुन जाणाऱ्या लोकांना याचा फटका बसला आहे.

एकाच दिवशी दोन बिघाड

मध्य रेल्वेवर आज लागोपाठ झालेल्या दोन बिघाडाने मध्य रेल्वेच्या सेवेचे तीन तेरा झाले. पहिला बिघाड ठाणे आणि मुलुंड स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायरवर एका वायरीचा तुकडा पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी दहा वाजताच्या सुमारास झालेला हा बिघाड दुरुस्त करण्यास १०.५८ वाजता सुरळीत झाला. दुसरा प्रकार सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास कांजूरमार्ग येथे सिग्नल यंत्रणेत आग लागल्याने मोठा बिघाड झाला. त्यामुळे भांडुप आणि विक्रोळी दरम्यानची स्वयंचलित सिग्नलची यंत्रणा बिघडली. त्यामुळे हा बिघाड सकाळी १०.४० वाजण्याच्या सुमारास सुरळीत झाली. परंतू सिग्नल यंत्रणा सुरळीत होऊनही सायंकाळ झाली तरीही लोकलचे वेळापत्रक दुरुस्त झाले नाही. त्यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

Loading...

सायंकाळी पाच वाजताची परिस्थिती

कसाराच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन विक्रोळीमध्ये थांबली आहे.लोकल ट्रेनमधून प्रवासी उतरुन ट्रॅकवरून चालत आहेत. लागोपाट लोकलच्या रांगा लागल्याने ट्रेनची बंचिंग झाली आहे. लोकल ट्रेनच्या मागे ट्रेन लाईनीत उभ्या झालेल्या दिसत आहेत. प्रवासी जीव धोक्यात घालून ट्रॅक वरून प्रवास करीत आहेत.महिला प्रवासी तरुणी यांना ट्रेनमधून उतरण्यासाठी लोक मदत करताना दिसत आहेत. काही जण घाटकोपरवरून ट्रॅकवरून चालत आले आहेत. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

येथे पोस्ट वाचा –

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us