दोन तरुण रुळावर बसून कानात हेडफोन घालून PUBG खेळत होते, अंगावरुन ट्रेन गेली

दोन तरुण रुळावर बसून कानात हेडफोन घालून PUBG खेळत होते, अंगावरुन ट्रेन गेली

हिंगोली : देशभरातील तरुणांना PUBG या गेमने वेड लावलंय. हे वेड एवढं वाढलंय की तरुणांचा यामध्ये जीवही जातोय. हिंगोलीत अशीच एक घटना घडली आहे. हिंगोलीत PUBG ने शनिवारी रात्री आठच्या सुमारास दोघांचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली. नागेश गोरे आणि स्वप्निल अन्नपूर्वे असं मयत झालेल्या दोन युवकांचं नाव आहे.

दोघे तरुण शहरापासून काही अंतरावर असलेल्या खटकाळी बायपास भागातील हनुमान मंदिर आपसी रेल्वे रुळावर कानात हेडफोन घालून गेम खेळत होते. यावेळी अकोल्याहून पूर्णाकडे जाणाऱ्या रेल्वे खाली येऊन दोघांचाही मृत्यू झाला. दोघांच्याही कानामध्ये हेडफोन असल्याचं घटनास्थळी दिसून आलं.

मागील काही दिवसांपासून PUBG गेम मोठ्या प्रमाणात तरुण खेळत आहेत. हा गेम खेळताना तरुणांना स्वतःचे जराही भान राहत नाही. या दोन तरुणांच्या मृत्यूसाठीही PUBG कारणीभूत ठरल्याचं समोर आलंय. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. याप्रकरणी अजून कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही.

मृत तरुणाचे वडील वाहक असून ते हनुमान नगर येथे राहत होते. तर खटळली बायपास परिसर हा PUBG गेम खेळणारांसाठी कट्टाच बनला आहे. या ठिकाणी रात्री-अपरात्री युवक मोबाईलमध्ये गेम खेळत बसतात. या घटनेने आता एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेऊन एकच टाहो फोडला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *