आज संध्याकाळी… उदय सामंत यांचे 6 खासदारांबाबत सर्वात मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?

Uday Samant : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे विधान केले आहे. या खासदारांच्या भवितव्याबाबत आणि संभाव्य निर्णयाबाबत संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे सामंत यांनी सांगितले.

आज संध्याकाळी... उदय सामंत यांचे 6 खासदारांबाबत सर्वात मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?
Uday Samant in 6 Shiv Sena Ubt MP
Image Credit source: Google
| Updated on: Jun 17, 2026 | 4:43 PM

गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, अखेर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. हे खासदार वेगळा गट तयार करून NDA ला पाठिंबा देणार असल्याची किंवा शिवसेनेत मर्ज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसला आहे. हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील, वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. अशातच आता राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी या खासदारांबाबत मोठं विधान केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले सामंत?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत, यावर बोलताना उदय सामंत यांनी म्हटले की, ‘उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार फुटले आहेत, त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे वेगळा गट स्थापनेची मागणी केली असेल किंवा शिवसेनेत मर्ज होण्याची मागणी केली असेल तर त्या संदर्भात लोकसभा अध्यक्ष निर्णय देतील. पुढे बोलताना सामंत यांनी, ‘चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ज्या कारणामुळे आम्ही उठाव केला आणि त्याच कारणामुळे जर कोणी उठाव करत असेल तर चार वर्षानंतरही त्यात बदल झाला नाही’ असं म्हणत ठाकरेंवर टीका केली आहे.

सहा खासदारांचा संध्याकाळपर्यंत निर्णय होईल – सामंत

फुटलेले ठाकरेंचे खासदार रवी राणा यांच्या पक्षात सामील होण्याच्या प्रश्नावर बोलताना सामंत म्हणाले की, जे खासदार फुटले त्यांना कुठलं नेतृत्व चांगला आहे, कुठलं नेतृत्व वाईट हे चांगलं कळतं. ते योग्य निर्णय घेतील. आमचं नेतृत्व मोठं आहे, आमच्या सोबत इतर नेतृत्व (उद्धव ठाकरे) यावं असं आम्हाला का वाटावं. कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून खूप चांगलं काम केलं आणि आता जर आमच्या पक्षात काही खासदार आले तर महाराष्ट्रात हा आमचा दोन नंबरचा मोठा पक्ष असेल. दिल्लीत गेलेल्या सहा खासदारांचा संध्याकाळपर्यंत निर्णय होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us