जयदत्त क्षीरसागरांना त्यांच्या मनात असलेली जबाबदारी देऊ : उद्धव ठाकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज (22 मे) शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना त्यांच्या मनातील जबाबदारी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जयदत्त क्षीरसागर आज सहकुटुंब, सहपरिवार शिवसेनेत आले आहेत. शिवसेनेच्यावतीने त्यांचे स्वागत. शिवसेनेसाठी बीड जिल्हा दूर्लक्षित …

जयदत्त क्षीरसागरांना त्यांच्या मनात असलेली जबाबदारी देऊ : उद्धव ठाकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज (22 मे) शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना त्यांच्या मनातील जबाबदारी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जयदत्त क्षीरसागर आज सहकुटुंब, सहपरिवार शिवसेनेत आले आहेत. शिवसेनेच्यावतीने त्यांचे स्वागत. शिवसेनेसाठी बीड जिल्हा दूर्लक्षित राहिला होता. आता मराठवाड्यासाठीची मोठी जबाबदारी आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या मनात असलेली जबाबदारी त्यांना मिळेल.”

एक्झिट पोलचा निकाल लागल्यानंतरच क्षीरसागर यांनी प्रवेश केल्याच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, “जयदत्त क्षीरसागर यांचा आणि एक्झिट पोलचा काहीही संबंध नाही. गेल्यावेळी प्रियांका चतुर्वेदी आल्या, तेव्हा निवडणूका देखील व्हायच्या होत्या.” दुसरीकडे क्षीरसागर यांनी शिवसेनेबद्दल आकर्षण होते म्हणूनच आपण शिवसेनेत प्रवेश घ्यायचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

एक्झिट पोल एनडीएच्या बाजुने आले आहेत. मग एक्झिट पोलही ईव्हिएमवरुनच काढले का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी माध्यमांनाच विचारला. ते विरोधी पक्षांच्या ईव्हिएमवरील आक्षेपाच्या मुद्द्यावर बोलत होते. तसेच एक्झिट पोलचे आकडे बदलू शकतील या विरोधकांच्या मताशी सहमत असल्याचे म्हणत त्यांनी माध्यमांना तुम्ही सांगत आहात ते आकडे कमी पडतील, असेही सांगितले.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीविषयी नाराज होते. ते लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेकदा शिवसेना-भाजपच्या मंचावरही दिसले. त्यांनी अनेकदा जाहीरपणे राष्ट्रवादीबाबात नाराजीही व्यक्त केली होती. अखेर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामाही दिला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *