AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणेंना हरवणारा तळ कोकणातील ठाकरे गटाचा बडा नेता ACB च्या रडारवर VIDEO

उद्धव ठाकरे गटाची कोकणातील ताकद घटत चालली आहे. असं असताना तळ कोकणातील एक बडा नेता रत्नागिरी भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या रडारवर आला आहे. कणकवली नगर पंचायतीला पत्र लिहून त्याच्या मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे.

नारायण राणेंना हरवणारा तळ कोकणातील ठाकरे गटाचा बडा नेता ACB च्या रडारवर VIDEO
Kokan
| Updated on: Jun 06, 2026 | 10:00 AM
Share

तळ कोकणातील उद्धव ठाकरे गटाचा बडा नेता ACB च्या रडारवर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरी भ्रष्टाचार विरोधी पथक ACB कडून चौकशी सुरु आहे. रत्नागिरी एसीबीने कणकवली नगर पंचायतीला पत्र लिहून वैभव नाईक यांच्या मालमत्तेची माहिती मागवली आहे. वैभव नाईक यांनी 2002 आणि 2006 साली दोन दुकान गाळे खरेदी केले होते. हे दुकान गाळे दोन आहेत की एक याची रत्नागिरी ACB ने कणकवली नगर पंचायतीकडे माहिती मागितली आहे. 2022 सालापासून वैभव नाईक यांची चौकशी सुरु आहे. “जी कुठली चौकशी आहे, त्याला सामोरा जाईन. कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही” असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

“येणाऱ्या काळात जी काही चौकशी आहे, त्याला उत्तर देईन. पाचवर्षांपासून माझी चौकशी सुरु आहे. अनेकांच्या चौकशा सुरु झाल्या त्यानंतर बंद झाल्या. माझी आजही चौकशी सुरु आहे. हा अन्याय आहे. मी या विरोधात लढणार आहे” असं वैभव नाईक म्हणाले. कोकणात उद्धव ठाकरे गटाला गळती लागली आहे. आधी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी, त्यानंतर काल बाळ माने यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. राजन साळवी एकनाथ शिंदे शिवसेनेत आहेत तर बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करु शकतात. आता कोकणात ठाकरे गटाचे जे मोजके प्रमुख नेते उरले आहेत, त्यात वैभव नाईक यांचा समावेश होतो.

जायंट किलर नेता

वैभव नाईक हे जायंट किलर आहेत. 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिग्ग्ज भाजप नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. राणे आणि नाईक कुटुंबाचं राजकीय वैर जुनं आहे. त्यानंतर वैभव नाईक सलग दोन टर्म कुडाळमधन निवडून आले. 10 वर्ष त्यांनी कुडाळ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांना नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपूत्र निलेश राणे यांनी पराभूत केलं.

Follow Us
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप