AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक, नेमकं काय घडतंय?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक, नेमकं काय घडतंय?
uddhav thackeray Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 5:18 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. ठाण्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्व विभाग प्रमुखांची तातडीने मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. तसेच आज संध्याकाळी पाच वाजता आदित्य ठाकरे देखील ठाणे येथे जाऊन पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण? 

ठाण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या ठाण्यातील कार्यालयामध्ये घुसून पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली? हे जरी स्पष्ट नसलं तरी यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत, ज्यामध्ये राजकीय वचर्स्व, विविध प्रोजेक्टमधील आर्थिक व्यवहार ही काही कारणं त्यामागे असल्याची चर्चा आता सुरू आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर  यांंच्या हत्येनंतर आता ठाण्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. कुटुंबाने पूर्णेकर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान पूर्णेकर  यांंच्या हत्येनंतर आता उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी या सर्व पार्शभूमीवर विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे आज आदित्य ठाकरे हे पूर्णेकर यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...