Delimitation Bill : शरद पवारांनी ठरवलं डिलिमिटेशनच्या मुद्यावर भाजपंसोबत जायचं, आता उद्धव ठाकरेंची भूमिका आली समोर

Delimitation Bill : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पूनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे. उद्धव ठाकरे गट काय भूमिका घेणार ते स्पष्ट झालं आहे.

Delimitation Bill : शरद पवारांनी ठरवलं डिलिमिटेशनच्या मुद्यावर भाजपंसोबत जायचं, आता उद्धव ठाकरेंची भूमिका आली समोर
aaditya Thackeray
| Updated on: Nov 28, 2026 | 2:08 PM

मतदारसंघ पूनर्रचना विधेयक डिलिमिटेशन बिलावरुन देशात दोन गट पडले आहेत. नरेंद्र मोदी सरकारने या बिलासाठी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्या अधिवेशनात हे बिल मंजूर करुन घेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सरकारने व्यूहरचना आखली आहे. इंडिया आघाडीतील मोठा पक्ष शरदचंद्र पवार पक्ष फोडण्यात भाजपला यश मिळालं आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिलिमिटेशनच्या मुद्यावर भाजपला केंद्रात साथ देणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. शरद पवार यांनी साथ दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे यांच्यावतीने त्याचे सुपूत्र आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“मतदारसंघ पूनर्रचना विधेयक जे आहे, त्यासाठी लागणारे पैसे करदात्याच्या खिशातून जाणार आहेत. महाराष्ट्रात आमदारांना पाच कोटी, खासदारांना पाच कोटी फंड आहे. डिलिमिटेशन विधेयक आणण्याऐवजी तो आमदार, खासदार फंड डबल करा. AI आहे, टेक्नोलॉजीची एवढी सगळी माध्यमं उपलब्ध आहेत. भाजपकडून हा गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न आहे” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Loading...

त्या पक्षाला देशात कोणी स्वीकरणार नाही

“भाजपला निवडणुकीसाठी मतदारसंघाचं जे क्षेत्र आहे, ते बदलायचं आहे. स्वत:च्या विजयाची शक्यता वाढवायची आहे. भाजपने 850 जागा वाढवू दे किंवा 1000 जागा करु दे. पण ज्या पक्षाने राम मंदिराला लुटलं, त्या पक्षाला देशात कोणी स्वीकरणार नाही. हे डिलिमिटेशन विधेयक जे आहे, ते देशद्रोही विधेयक आहे” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

स्वाभिमानाची गरज आहे

“या देशाला प्रामाणिकपणाची, स्वाभिमानाची गरज आहे. भाजपच्या हुकूमशाही, तानाशाही विरोधात लढण्याची गरज आहे, झुकणाऱ्यांची नाही. शरद पवार यांच्या पक्षाबद्दल मी बोलू शकत नाही. आम्ही या बिलाच्या विरोधात आहोत, हे बिल देशाविरोधात आहे” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

अंबादास दानवे काय म्हणाले

“मी चिन्हं बदलेलं नाही, तुतारी मधून कमळ येत आहे. काही कःसद्रकच्या भूमिका वेगळ्या आहेत. देशात भाजपच्या विरोधात वातावरण आहे. शरद पवार यांच्या पक्षाने अनेक अडचणी सोसल्या आहेत. कोल्हे म्हणतात अजून निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी बैठकीत नाही. आव्हाडांच्या भूमिकेनंतर कोल्हेनी भूमिका व्यक्त केली. भाजपाच्या भूमिकेला पाठिंबा दिला तर पुढे जनता नाकारलं, अजूनही वेळ गेलेली नाही असे मला वाटते” असं अंबादास दानवे म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us