शिवसेनेने माफी मागावी, उद्धव ठाकरेंनी राऊतांवर कारवाई करावी : चंद्रकांत पाटील

शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chandrakant Patil on Sanjay Raut) नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

शिवसेनेने माफी मागावी, उद्धव ठाकरेंनी राऊतांवर कारवाई करावी : चंद्रकांत पाटील

मुंबई : “छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत (Chandrakant Patil on Sanjay Raut) यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही”, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगितले. शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chandrakant Patil on Sanjay Raut) नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राज्यात विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे, हेच संजय राऊत यांच्या आजच्या विधानावरून दिसत आहे. शिवसेना या उद्दाम सवालाशी सहमत आहे का, हे शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले पाहिजे.  उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली तरच त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची खात्री पटेल”.

“माजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी शिवसेनेवर आणि विशेषतः संजय राऊत यांच्यावर केलेली टीका राऊत यांना झोंबली असेल तर ते समजू शकते. त्यांना शक्य असेल तर त्यांनी छत्रपतींच्या सवालांना उत्तरे द्यायला हवी होती. पण छत्रपतींना उत्तर देता येत नाही तर थेट त्यांच्या वंशाचा पुरावा मागणे हे उद्दामपणाचेच लक्षण आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगायची आणि दुसरीकडे त्यांच्या वंशजांबद्दल अशी खालच्या दर्जाची टिप्पणी करायची हे शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी दाखवणारे आहे”, असा हल्ला चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर चढवला.

संजय राऊत काय म्हणाले?

उदयनराजे हे माजी खासदार आहेत. शरद पवार हे जाणते राजे आहेत, त्यांना लोकांनी उपाधी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांवर कुणाची मालकी राहू शकत नाही. उदयनराजे यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे”, असा हल्ला संजय राऊतांनी केला होता.

संबंधित बातम्या 

उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे : संजय राऊत 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *