वैष्णवी हगवणे प्रकरण, निलेश चव्हाणाच्या घरातून अखेर ती वस्तू जप्त, पोलिसांच्या हाती लागणार पुराव्यांचं घबाड?

मोठी बातमी समोर येत आहे, आज पोलिसांकडून निलेश चव्हण याच्या घराची झडती घेण्यात आली आहे, पोलिसांनी चव्हाण याच्या कर्वेनगरमधील घराची झडती घेतली.

वैष्णवी हगवणे प्रकरण, निलेश चव्हाणाच्या घरातून अखेर ती वस्तू जप्त, पोलिसांच्या हाती लागणार पुराव्यांचं घबाड?
| Updated on: May 31, 2025 | 7:48 PM

पुण्यातील तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात पोलिसांनी तिचा सासरा, सासू, पती, दीर आणि नणंद यांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील एक आरोप निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर शुक्रवारी निलेश चव्हाण याच्या नेपाळमधून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

निलेश चव्हाण याला अटक करण्यात आल्यानंतर आज पोलिसांकडून त्याच्या कर्वेनगरमधील घराची झडती घेण्यात आली आहे. त्याच्या घराची झडती घेण्यासाठी पोलीस निलेश चव्हाण याला घेऊन त्याच्या घरी पोहोचले.  निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिष्मा हिचा मित्र आहे, त्याच्याकडे वैष्णवीची सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगणेचा मोबाईल होता, हा मोबाईल पोलिसांना हवा होता, त्यासाठी निलेश चव्हाण याच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये पोलिसांनी हे दोन्ही मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलमधून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

काय आहे निलेश चव्हाणवर आरोप  

निलेश चव्हाण हा करिष्मा हगवणेचा मित्र आहे, वैष्णवीचं बाळ त्याच्याकडे होतं. वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला त्याने बंदूक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता. पोलिसांच्या सहा पथकांकडून त्याचा शोध सुरू होता.

नेपाळमधून अटक 

निलेश चव्हाण हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याहून रायगडला गेला, तेथून तो बायरोड दिल्लीला पोहोचल, दिल्लीहून बसने तो उत्तर प्रदेशमधील गोरखपूरला गेला, तेथून त्याने भारताची सीमा क्रॉस करून नेपाळमध्ये प्रवेश केला. तो चार ते पाच दिवस नेपाळमध्ये होता अशी माहिती समोर येत आहे, त्यानंतर तो भारताच्या सीमावर्ती भागात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला आता पुण्यात आणण्यात आलं आहे, दरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमधून काही महत्त्वाचे पुरावा हाती लागण्याची शक्यता आहे.