AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापट यांनी जास्त पेरू खाल्ले, मी खाल्ले नाहीत म्हणून…, रवींद्र धंगेकर डीजेच्या मुद्द्यावर आक्रमक

सध्या पुण्यातील डिजेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे, विद्यानंद बापट यांनी डिजेला विरोध केला आहे. तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी मात्र समर्थन केलं आहे. यावेळी त्यांनी बापट यांच्या भूमिकेला विरोध केला आहे.

बापट यांनी जास्त पेरू खाल्ले, मी खाल्ले नाहीत म्हणून..., रवींद्र धंगेकर डीजेच्या मुद्द्यावर आक्रमक
डीजेच्या मुद्द्यावर रवींद्र धंगेकर यांची आक्रमक भूमिका Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 5:28 PM
Share

सध्या पुण्यातील डिजेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. गणेशोत्सव काळात डीजे असावा की नाही यावरून दोन मतप्रवाह पडले आहेत. विद्यानंद बापट यांनी डिजेला विरोध करताना काही महत्त्वाचे मुद्दे माडंले तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मात्र डीजेचं समर्थन करताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते टीव्ही 9 मराठीशीवर बोलत होते. डीजे असावा की नाही? यावरून रवींद्र धंगेकर आणि विद्यानंद बापट यांच्यामध्ये चांगलाच वादविवाद झाल्याचं यावेळी पहायला मिळालं.

लोकभावनेतून निर्माण झालेल्या सणावर बंधन नको, उद्या बापट सर्व सणांवर बंदी आणण्याची मागणी करतील, कुंभमेळा, नवरात्र सणांवर देखील बंदी आणा अशी मागणी करतील. असं यावेळी रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांच्या आरोपांना उत्तर देताना डीजे प्रमाणेच ढोल ताशांचाही तितकाच त्रास होतो. परंपरेच्या नावाखाली याचं देखील समर्थन होऊ शकत नाही, असं यावेळी बापट यांनी म्हटलं.

दरम्यान डिजे, लाऊड स्पीकर म्हणजे देशावर फार मोठं संकट नाही, तुम्ही समजून घ्या बापट हे अलंकारीक मराठी भाषा बोलतात, त्यातून ते कसे वेगळे आहेत, हे भासवण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा काही उपयोग नाहीये, बापट यांनी जास्त पेरू खाल्ले मी खाल्ले नाहीत, म्हणून मला अशी भाषा बोलता येत नाही, असंही यावेळी धंगेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान डीजे डॉल्बी ही आपली पंरपरा नाही, सणावर बंदी घालण्याचा माझ्या मुद्दा कधीच नाहीये. असंही यावेळी बापट यांनी म्हटलं आहे. तर त्याला प्रत्युत्तर देताना बापटांना क्रांती घडवायची असेल तर त्यांनी न्यायालयात जावं, असं यावर उत्तर शिवसेना शिंदे गटाचे नेते  धंगेकर यांनी दिलं आहे. दरम्यान प्रत्येक सण उत्सवाला लोकभावनेची किनार असते, मात्र त्यामुळे जर नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांनी तो का सहन करावा? असा थेट सवालच यावेळी बापट यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस