Obc reservation : ओबीसी आरक्षणाशिवाय मध्ये प्रदेशात निवडणुका नाही तर महाराष्ट्रातही नाही – विजय वडेट्टीवार

Obc reservation : ओबीसी आरक्षणाशिवाय मध्ये प्रदेशात निवडणुका नाही तर महाराष्ट्रातही नाही - विजय वडेट्टीवार
vijay wadettiwar

इंपेरिकल डेटाशिवाय आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे शक्य नाही, अशी भूमिका मध्य प्रदेशने घेतली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात होत नसेल तर महाराष्ट्रातही होणार नाही, अशी भूमिका निवडणुकांच्या बाबतीत काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 14, 2021 | 6:35 PM

राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून जोरदार राजकारण तापले आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे अनेक वर्गातून सध्याच्या निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली आहे. आरक्षणाचा गुंता सुटेपर्यंत निवडणुका नको, अशी स्पष्ट भूमिका राज्यात काँग्रेसकडून घेण्यात आली आहे. आणि त्यालाच आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला आहे.

मध्यप्रदेशात नाही तर महाराष्ट्रातही नको

इंपेरिकल डेटाशिवाय आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे शक्य नाही, अशी भूमिका मध्य प्रदेशने घेतली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात होत नसेल तर महाराष्ट्रातही होणार नाही, अशी भूमिका निवडणुकांच्या बाबतीत काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा द्यावा, ही मागणी आमची आजही आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. चुका आहे असं सांगितलं जातं, फार चुका नाहीत, त्या डेटाच्या आधारावर आरक्षण देता येऊ शकते, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे योग्य नाही

आगामी निवडणुका आरक्षणशिवाय घेणं योग्य होणार नाही, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडता येणार नाही, अशी भूमिका सध्या काँग्रेसने घेतली आहे. सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे, त्या सुनावणीकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.

राज ठाकरे चांगले जाणकार

महाविकास आघाडी मजबूत आहे, त्यामुळे ती तुटण्याचा प्रश्नच नाही. राज ठाकरे चांगले जाणकार आहेत, त्यांना सगळं माहीत आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा सांगितलं महाविकास आघाडी सरकार जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे, असेही वडेट्टीवार म्हणालेत.

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

स्वाधार शिष्यवृत्ती, वसतिगृह प्रवेश व परदेश शिष्यवृत्ती प्रक्रिया आता ऑनलाईन होणार, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Chandrakant patil : हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत गुप्त मतदान घ्या-चंद्रकांत पाटील

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें