AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी सुरू असतानाच ग्रामस्थांचा मोठा निर्णय, थेट..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातानंतर अनेक संशय ही सातत्याने व्यक्त केली जात आहेत.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी सुरू असतानाच ग्रामस्थांचा मोठा निर्णय, थेट..
Ajit Pawar's plane crash
| Updated on: Feb 23, 2026 | 10:03 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून सकाळी 8.10 ला निघाले. त्यांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अपघात झाला. सुरूवातीलाच ज्यावेळी या विमान अपघाताचे व्हिडीओ पुढे आली, समजले की, हा विमान अपघात किती जास्त भीषण आहे. अजित पवार यांच्यासह विमानातील सर्वांचा मृत्यु झाल्याची बातमी काही वेळातच आली. अजित पवार यांचा मृत्यु झाला, हे कळताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. आपल्या लाडक्या दादांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बारामतीकडे पोहोचले. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सध्या सुरू आहे. मात्र, यादरम्यानच अनेक संशय ही व्यक्त केली जात आहेत. सातत्याने अजित पवार यांचा अपघात की घातपात? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्यामध्येच आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही मोठी दावे केली आहेत. यासोबत VSR कंपनीवर त्यांनी गंभीर आरोप केली. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे VSR कंपनीच्याच विमानाने येते होते, ज्याचा अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुलगा जय पवार यांच्यासोबत त्या मुंबईला पोहोचल्या. मात्र, त्यांच्या या शपथविधीबद्दल पवार कुटुंबातील इतर सदस्यांना कोणतीही कल्पना नव्हती.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चाैकशी केली जावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चाैकशीच्या मागणी करिता आज बारामती येथील डोरलेवाडी गावातील ग्रामस्थांनी बंदची हाक दिली. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. अपघात की घातपात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित आहेत.

राज्य सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे या मागणीसाठी बारामती तालुक्यातील डोरलेवाडी गाव आज बंद ठेवण्यात आले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची अनेक व्हिडीओ पुढे आली आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये अजित पवार यांचे विमान स्पष्टपणे एका बाजूला हवेतच झुकताना दिसत आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा