पंढरपूरातील आषाढी यात्रेची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार;विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 10 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेदिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या महापुजेसाठी आमंत्रित केले जाणार आहे

पंढरपूरातील आषाढी यात्रेची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार;विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय
पंढरपूरातील आषाढी यात्रेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
| Updated on: May 12, 2022 | 3:42 PM

पंढरपूरः पंढरपूरातील विठ्ठल मंदिरातील (Vitthal Rukmini Temple) विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा करण्याचा मान मिळावा म्हणून अनेकांची इच्छा असते. दरवर्षी ही महापूजा मुख्यमंत्री (Mahapuja Chief Minister) आणि त्यांच्या पत्नीला मानाने दिली जाते, तसाच एक मान सर्वसामान्य नागरिकांती एका दांपत्यालाही दिला जातो. आताही झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांना 10 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेदिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेसाठी आमंत्रित केले जाणार आहे. असा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेतला गेला आहे. त्यामुळे 10 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पूजा होणार असल्याचे सांगितले गेले.

मंदिर विकासावर चर्चा

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत मंदिराविषयी आणि परिसरातील महत्वाच्या विषयावर महत्वाचे विषय घेतले जातात. यावेळी या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाडी यात्रेचे निमंत्रण आणि मंदिराच्या विकासावर चर्चा करण्यात आल्या.

रुक्मिणी मातेच्या चरणावर लवकरच वज्रलेप

यावेळी या बैठकीतही रुक्मिणी मातेच्या चरणावर लवकरच वज्रलेप करण्याचाही निर्णय घेतला गेला आहे. यावेळी समितीच्या सदस्यांनी सांगितले की, विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशीदेखील काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीतील हा महत्वाचा विषय असल्याचेही मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी सांगितले.

भाविकांसह नागरिकांमध्ये उत्साह

कोरोना काळानंतर गर्दीत आणि उत्साहात पंढरपूरची आषाढी यात्रा होत आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या भाविकांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे पंढरपूरातील ही आषाढी यात्रा उस्ताहात होण्याची चिन्हे आहेत. मंदिर समितीच्या बैठकीत मंदिराच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळीही रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप करण्याचाही निर्णय घेतला गेला आहे.