Aurangabad | औरंगाबादेत अकबरुद्दीन ओवैसींच्या गाडीची दुचाकीला धडक, ताफा थांबवून ओवैसेंनी केली विचारपूस, पहा VIDEO

Aurangabad | औरंगाबादेत अकबरुद्दीन ओवैसींच्या गाडीची दुचाकीला धडक, ताफा थांबवून ओवैसेंनी केली विचारपूस, पहा VIDEO
Image Credit source: tv9 marathi

एरवी आक्रमक विचारसरणी आणि जहाल वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या अकबरुद्दीन ओवैसींमधील माणुसकीचं दर्शन घडल्याची चर्चा आज औरंगाबादकरांमध्ये दिसून आली.

दत्ता कानवटे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

May 12, 2022 | 3:38 PM

औरंगाबादः औरंगाबादेत आज एमआयएमचे आक्रमक नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांचा दौरा आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचे लहान बंधू असलेले अकबरुद्दीन ओवैसी हेदेखील त्यांच्या जहाल वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. एमआयएमची (MIM) कट्टर विचारसरणी त्यांच्या वक्तव्यांतून दिसून येते. औरंगाबादेत मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत मनसेने जे वातावरण निर्माण केलं आहे, त्या पार्श्वभूमीवर अकबरुद्दीन ओवैसी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मात्र या आक्रमक नेत्याच्या वागणुकीत आज माणुसकीचं दर्शनही झालं. अकबरुद्दीन ओवैसींनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज औरंगाबादमधील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुल्ताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबच्या कबरीला भेट दिली. त्यानंतर शहरात परतीच्या वाटेवर असताना पडेगाव परिसरात अकबरुद्दीन ओवैसींच्या गाडीची एका दुचाकीशी धडक बसली. हे पाहून अकबरुद्दीन ओवैसी गाडीच्या खाली उतरले. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून ते दुचाकीस्वारापर्यंत पोहोचले. स्वतःहून त्यांनी दुचाकी चालकाची विचारपूस केली. त्याने पायाकडे दुखापत दाखवली असता तेथे नेमके कुठे लागले आहे, हेदेखील त्यांनी पाहिले. दुचाकी स्वाराला किरकोळ लागले होते. त्यानंतर ओवैसी तेथून निघून गेले. अकबरुद्दीन ओवैसींच्या गाडीने दिलेल्या धडकेमुळे अनेक नागरिक गोळा झाले. ओवैसींचा ताफा पुढे निघून गेल्यावर जमाव पुन्हा पांगला.
एरवी आक्रमक विचारसरणी आणि जहाल वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या अकबरुद्दीन ओवैसींमधील माणुसकीचं दर्शन घडल्याची चर्चा आज औरंगाबादकरांमध्ये दिसून आली.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें