दहीहंडीच्या उत्सवाला लागलं गालबोट, बुलढाण्यात भिंत कोसळून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, दुर्घटनेत आणखी एक मुलगी गंभीर जखमी

Buldhana News : बुलढाण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमात भिंत कोसळून एक दुर्घटना झाली. त्यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून आणखी एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यामुळे दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे.

दहीहंडीच्या उत्सवाला लागलं गालबोट, बुलढाण्यात भिंत कोसळून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, दुर्घटनेत आणखी एक मुलगी गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 9:08 AM

बुलढाणा | 8 सप्टेंबर 2023 : कृष्णजन्माष्टमी निमित्त राज्यभरात दहीहंडीचा (dahi handi) कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र या सणाच्या उत्साहाला एका दुर्घटनेमुळे गालबोट लागले. बुलढाणा येथे दहीहंडीचा थरार रंगलेला असतानाच एक भिंत कोसळून (wall collapsed) मोठी दुर्घटना झाली. यामध्ये अवघ्या ८ वर्षांच्या मुलीला जीव गमवावा लागला असून आणखी एक मुलगी (वय ९) ही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरातील मानसिंग पुरा येथे रात्रीच्या सुमारासा ही अतिशय दुर्दैवी घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दहीहंडी ज्या दोरीला बांधली होती, त्याचे एक टोक गॅलरीला बांधलेले होते. काही तरूण हे ती दहीहंडी फोडण्यासाठी त्या दोरीला लटकले असता, त्यांच्या वजनाच्या भाराने भिंत वाकली आणि ती खाली कोसळली. दहीहंडी बघत असलेले काही जण त्याखाली सापडले. त्यामध्ये एका ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर आणखी एक ९ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मुंबईत १२४ गोविंदा जखमी

दरम्यान राज्यभरासह मुंबईतही दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मात्र यावेळीच विविध ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये सुमारे १२४ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल केल्याचेही समजते. तर ६२ लोकांवर उपचार करून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. ठाण्यामध्ये १७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Non Stop LIVE Update
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.