AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan चा मुलगा अबराम याच्या नावातील ‘राम’, किंग खानच्या लेकाच्या नावाचं काय महत्त्व?

Shah Rukh Khan | शाहरुख खान याच्या लहाना मुलाच्या नावात पैगंबर इब्राहिम आणि राम... काय आहे अबराम नावाचा अर्थ? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याच्या मुलाच्या नावाची चर्चा... खुद्द किंग खान यांनी सांगितलं होतं 'अबराम' नावाचा अर्थ...

Shah Rukh Khan चा मुलगा अबराम याच्या नावातील ‘राम’, किंग खानच्या लेकाच्या नावाचं काय महत्त्व?
| Updated on: May 05, 2024 | 1:51 PM
Share

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अभिनेता त्यांच्या मुलांबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मोठा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान यांनी करियरला सुरुवात केली आहे. तर किंग खान याचा लहान मुलगा शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. अबराम असं शाहरुख याच्या लहान मुलाचं नाव आहे.

सांगायचं झालं तर, शाहरुख खान आणि गौरी खान यांचा लहाना मुलगा अबराम खान यांच्या नावाचा अर्थ देखील फार खास आहे. एका मुलाखतीत खुद्द शाहरुख खान याने अबराम याच्या नावाचा अर्थ सांगितला होता. शाहरुख खान याच्या लहाना मुलाच्या नावात पैगंबर इब्राहिम आणि राम दोन देवांच्या नावांचा समावेश आहे…

किंग खान याचा लहान मुलगा अबराम याच्या नावात ‘राम’ आहे आणि मुलाच्या नावात असलेल्या ‘राम’ शब्दाचा अर्थ देखील अभिनेत्याने चाहत्यांना सांगितला. शाहरुखने सांगितले की, मुलाचं नाव पैगंबर इब्राहिम यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. मुस्लीम धर्मात पैगंबर इब्राहिम यांचं फार मोठं स्थान आहे.’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘माझी पत्नी हिंदू आणि मी मुस्लीम आहे… भारत देशात जसं वातावरण आहे, तसंच वातावरण माझ्या घरात देखील आहे. अनेक जण या गोष्टीमुळे माझ्यावर टीका करतात. पण मला माझ्या मुलांना समानता शिकवायची आहे. अशात अबराम आहे, म्हणजे इब्राहिम आणि राम म्हणजे हिंदू धर्मातील देवता आहेत…’ असं किंग खान म्हणाला. ज्यामुळे अबराम याचं नाव लिहितीना देखील किंग खान AbRam Khan असं लिहितो…

शाहरुख याचा लहान मुलगा अबराम खान 9 वर्षांचा आहे. अनेक ठिकाणी अबराम वडील शाहरुख खान याच्यासोबत दिसतो. तर सोशल मीडियावर अबराम याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सुहाना खान हिच्यासोबत देखील अबराम याला अनेकदा स्पॉट करण्यात येत.

शाहरुख खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘पठाण’ सिनेमानंतर एकापेक्षा एक सिनेमे दिल्यानंतर किंग खान लेक सुहाना हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सुहाना ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून वडिलांसोबत चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची शुटिंग लंडन याठिकाणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...