AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाराष्टातील खासदार युद्धभूमीत अडकला, कार्यालयाने दिली महत्त्वाची अपडेट

War Update : इराणने दुबईसह आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. देशातील हजारो लोक युद्ध भूमीत अडकून पडले आहेत. यात महाराष्ट्रातील एका खासदाराचाही समावेश आहे.

मोठी बातमी! महाराष्टातील खासदार युद्धभूमीत अडकला, कार्यालयाने दिली महत्त्वाची अपडेट
DR Kalyan KaleImage Credit source: Google
| Updated on: Mar 02, 2026 | 6:11 PM
Share

इस्रायल आणि अमेरिका सातत्याने इराणवर हल्ले करत आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणने दुबईसह आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. तसेच दुबई आणि इतर काही शहरांमधील महत्त्वाच्या इमारतींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. राज्यासह देशातील हजारो लोक युद्ध भूमीत अडकून पडले आहेत. यात राज्यातील एका खासदाराचाही समावेश आहे. जालना मतदार संघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे दुबईत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता त्यांच्या कार्यालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

खासदार कल्याण काळे दुबईत अडकले

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले होत आहे. इराणकडून दुबईवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आता यूएईमध्ये विमानसेवा बंद असल्याने जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे काही नातेवाईकांना दुबईत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता जनसंपर्क कार्यालयाने कल्याण काळे हे सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.

खासदार काळे पूर्णपणे सुरक्षित

खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाने फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘खासदार डॉ.कल्याण काळे हे परिवारासह पूर्वनियोजित दौऱ्यानिमित्त दुबई येथे गेले आहेत. त्यांचा आमच्याशी नियमित संपर्क सुरू आहे. खासदार काळे पूर्णपणे सुखरूप असून त्यांच्या प्रकृती व सुरक्षिततेबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. सर्व कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.’

नागपूरचे पर्यटक दुबई मध्ये अडकले

नागपूरच्या चिकटे आणि घारफेंडे कुटुंबातील 9 जण दुबईत अडकले आहेत. पर्यटनासाठी आखाती देशात गेलेल्या या लोकांना 3 मार्चला विमानाने परत यायचे होते. मात्र दुबई विमानतळ बंद केल्याने पर्यटक दुबईत मध्येच अडकून पडले आहेत. हॉटेल मधून बाहेर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. हॉटेल कडून नाश्ता, जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिसाईल हल्ल्यामुळे सर्वांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दुबई मधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी या पर्यटकांनी सरकारला विनंती केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...