वर्ध्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच, लग्न सभारंभात घट, जन्म-मृत्यूदराची स्थिती काय?

अनेक ठिकाणी नागरिकांची होणारी तोबा गर्दी कोरोना संसर्ग झपाट्याने वाढण्यासाठी कारणीभूत ठरत होती. (Wardha Corona pandemic Birth rate increased Marriage decrease)

वर्ध्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच, लग्न सभारंभात घट, जन्म-मृत्यूदराची स्थिती काय?
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 10:22 AM

वर्धा : राज्यात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. यामुळे लग्न सभारंभांना ब्रेक लागला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांची होणारी तोबा गर्दी कोरोना संसर्ग झपाट्याने वाढण्यासाठी कारणीभूत ठरत होती. यामुळे केवळ बोटावर मोजण्याइतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यांसह विविध कार्यक्रम होत आहेत. या काळात जन्मदर हा एक टक्क्याने वाढल्याचं चित्र वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. (Wardha Corona pandemic Birth rate increased Marriage decrease)

लग्नसोहळ्यांवर नियम आणि अटी कायम

गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे विवाह सोहळ्यांसह धार्मिक आणि विविध कार्यक्रमांवर अटी-शर्थी लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या काही व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पाडले जात आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सध्या राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले.आहेत. या कठोर निर्बंधांच्या काळात धुमधडाक्यात होणाऱ्या लग्नसोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून लग्नसोहळ्यांवर नियम आणि अटी कायम असल्याने अनेक लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. तर काहींनी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळे उरकले आहेत.

जन्मदर एक टक्क्याने वाढला

वर्धा जिल्ह्यात कोरोना काळात जन्मदर हा एक टक्क्याने वाढल्याचं चित्र दिसत आहे. नुकतंच या जिल्ह्यातील दोन वर्षातील अहवाल समोर आला आहे. वर्धा जिल्ह्यात 2019 मध्ये 16 हजार 681 बालकांनी जन्म घेतला. त्यावेळी जिल्ह्याचा जन्मदर 12.40 टक्के होता. तर 2020 मध्ये जिल्ह्यात 17 हजार 798 बालकांनी जन्म घेतला. त्याचा जन्मदर 13.11 टक्के असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या तीन वर्षातील जन्म-मृत्यू आणि विवाहाची आकडेवारी 

वर्ष   — जन्म   —  मृत्यू —  विवाह

2019 – 16689  – 9210  – 5790

2020 – 17797 – 9117 – 4057

2021 (एप्रिलपर्यंत) – 4770 -3293 – 920

महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन 

महाराष्ट्र सरकारने येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतात काही रुग्ण आढळत आहे. त्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे.

(Wardha Corona pandemic Birth rate increased Marriage decrease)

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लॅन, कोणत्या उपाययोजनांचा समावेश?

कोरोनाग्रस्त नातेवाईकांच्या भोजनाची गैरसोय, सोन्याची अंगठी विकून मोफत डब्याची सोय

नगर, यवतमाळ, सिंधुदुर्गसह 14 जिल्हे रेड झोनमध्ये, तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती काय?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.