Wardha Congress | वर्ध्यात काँग्रेसची मोर्चेबांधणी; संघटनात्मक निवडणुकीचा बिगुल, बुथ स्तरापासून सुरुवात

| Updated on: May 29, 2022 | 2:23 PM

जिल्ह्यातील देवळी-पुलगाव, हिंगणघाट-समुद्रपूर-सिंदी, वर्धा-सेलू व आर्वी-आष्टी-कारंजा या चार विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण बारा ब्लॉक निश्चित करण्यात आले आहेत. या ब्लॉकमधील प्रत्येक बुथवरुन बुथ अध्यक्ष आणि डेलिगेट्स अशा दोघांची निवड केली जाणार आहे. सर्व बुथवरील अध्यक्ष व डेलिगेट्स हे एका ब्लॉकमध्ये सहा सदस्यांची निवड करतील.

Wardha Congress | वर्ध्यात काँग्रेसची मोर्चेबांधणी; संघटनात्मक निवडणुकीचा बिगुल, बुथ स्तरापासून सुरुवात
वर्ध्यात काँग्रेसची मोर्चेबांधणी; संघटनात्मक निवडणुकीचा बिगुल
Image Credit source: t v 9
Follow us on

वर्धा : काँग्रेसने संघटन मजबूत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. जिल्ह्यापासून तर बुथ स्तरापर्यंत संघटन मजबूत करण्यासाठी निवडणुका घेतल्या जाणार आहे. याची सध्या बुथस्तरावरुन सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसात जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी बदलेले दिसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काँग्रेसला पुन्हा पूर्वीची ताकद मिळवून देण्याकरिता मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. याकरिता स्थानिक सद्भावना भवनात (Sadbhavana Bhavan) काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा प्रभारी जिया पटेल (Jia Patel) व जिल्हा निवडणूक अधिकारी संजिता सिहाग (राजस्थान), जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर (Manoj Chandurkar) यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

बुथस्तरावरुन निवडणूक प्रक्रिया

या बैठकीमध्ये जिल्हा, ब्लॉक व बुथ स्तरीय संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्यावतीने डीजिटल सदस्यता नोंदणी केली होती. या डीजिटल नोंदणी केलेल्या सदस्यांनाच या संघटनात्मक निवडणुकीत उभे राहता येणार आहे. तसेच त्यांनाच मतदानही करता येणार आहे. बुथस्तरावरुन ही निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. टप्प्याटप्प्यात ती जिल्हास्तरावर पोहोचणार आहे. काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही बुथ, ब्लॉक व जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.

72 जणांमधून जिल्हाध्यक्षाची निवड

जिल्ह्यातील देवळी-पुलगाव, हिंगणघाट-समुद्रपूर-सिंदी, वर्धा-सेलू व आर्वी-आष्टी-कारंजा या चार विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण बारा ब्लॉक निश्चित करण्यात आले आहेत. या ब्लॉकमधील प्रत्येक बुथवरुन बुथ अध्यक्ष आणि डेलिगेट्स अशा दोघांची निवड केली जाणार आहे. सर्व बुथवरील अध्यक्ष व डेलिगेट्स हे एका ब्लॉकमध्ये सहा सदस्यांची निवड करतील. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष अशी पदे राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक ब्लॉकमधील सहा पदाधिकारी म्हणजे 72 जणांमधून जिल्हाध्यक्षाची निवड होणार आहे. आता जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाची निवड होते, हे येणारा काळच सांगेल. बुथवर काम करणारा हा शेवटचा कार्यकर्ता समजला जातो. कारण तोच खऱ्या अर्थानं मतदारांशी जुडलेला असतो. त्यानंतर केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावरील संघटन मजबूत होते. बुथ मजबूत झाल्यास तालुका मजबूत होईल. तालुका मजबूत झाल्यास जिल्हा मजबूत होईल. त्यामुळं प्रत्येक पक्ष हा बुथावर फोकस करतो. बुथ मजबूत असेल, तर निवडणूक लढणे सोपे जाते.

हे सुद्धा वाचा